आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने हिंदुत्त्व विकून मुख्यमंत्रिपद मिळवल, हे स्थगिती सरकार ठेकेदाराकडून पैसे उकळण्यासाठीच सुरु- नारायण राणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नारायण राणेंचा सरकारवर 'प्रहार'

सिंधुदुर्ग-  महाविकास आघाडीच्या माध्यमातून स्थापन झालेले सरकार हे राज्याच्या विकासासाठी नव्हे स्वार्थसाठी एकत्र आले आहेत, अशा शब्दांत भाजप नेते नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर निशाना साधला. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकासआघाडी सरकारला स्थगिती सरकार हे नाव दिले आहे. ठाकरे "सरकार विकास करण्यासाठी अस्तित्वात आले नसून काम बंद करण्यासाठी आले आहे," असेही राणे म्हणाले. कणवली येथील पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, "28 नोव्हेंबरला शपथविधी झाला, हिंदुत्त्व विकून शिवसेनेने मुख्यमंत्रिपद घेतलं. आज 8 डिसेंबर आहे. तरीही अजून यांचs खातेवाटप झाले नाही. खातेवाटपच काय पण अजून मंत्रीही ठरलेले नाहीत. सध्या तीन पक्षांचे मिळून सरकार आले आहे. त्यांना मी स्थगिती सरकार नावं ठेवले आहे. या सरकारने मागील 10 दिवसात केवळ मेट्रो आणि त्यासारख्या अन्य विकास कामांना स्थगिती देण्याचे काम केले. त्यामुळे सध्या विकास कामं बंद पडली. हे सरकार विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी अस्तित्वात नाही आलं. कामे बंद करायची, ठेकेदाराला बोलावून घ्यायचे आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चालले आहे. हे सरकार दीर्घ काळ चालणार नाही," असे राणे म्हणाले. कोकणात अद्याप या सरकारचं अस्तित्वही कुठं दिसत नाही
 
"सध्या या सरकारचा एक खासदार कोकणात बैठका घेत आहे. केंद्रात भाजपचे सरकार आहे, त्यात शिवसेना नाही. असे असतानाही शिवसेनेचा खासदार सिंधुदुर्गमध्ये शासकीय बैठका कसा घेतो? अधिकाऱ्यांना सुचना कशा करतो? हे जनतेसाठी, शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी नाही, तर फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदाराने आढावा बैठका घेतल्या. खासदार अशा आढावा बैठका कुठल्या अधिकारात घेतो. सत्तेतील पक्षाचा खासदार नसताना शासकीय अधिकाऱ्यांना आदेश कसे देऊ शकतो? विमानतळ 1 तारखेला चालू होणार हे त्यांनी कोणत्या अधिकारात सांगितलं? त्यामुळे शिवसेनेकडून बेकायदेशीर बैठका घेऊन आम्ही काहीतरी करतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे," असा घणाघात राणेंनी यावेळी केला.

बातम्या आणखी आहेत...