आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - शिवसेनेच्या मंत्र्यांनी शनिवारी रात्र महाआरती केल्यानंतर आपल्या खिशातील राजीनाम्याच्या कागदी होड्या केल्या व त्या शरयू नदीमध्ये फेकल्या. त्या होड्या आज सकाळी शरयूच्या तटावर राहणाऱ्या रहिवाशांना सापडल्या असल्याचे समजते, अशी उपहासात्मक टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर केली आहे.
विखे पाटील यांनी रविवारी एक प्रसिद्धिपत्रक काढले. त्यात त्यांनी उद्धव यांच्या अयोध्या दौऱ्याचे चांगलेच वाभाडे काढले. त्यात ते म्हणतात, दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे भाजपला उद्देशून म्हणाले होते, निर्लज्जांनो, राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू? त्यामुळे अयोध्येला गेल्यानंतर ते आता राम मंदिराच्या बांधकामाचा शुभारंभ केल्याशिवाय मुंबईला परतणार नाहीत, असाच अनेकांचा समज झाला होता. पण ते तर केवळ सहकुटुंब-सहपरिवार तीर्थयात्रेला गेले होते.
अयोध्येत जाऊन शिवसेना पक्षप्रमुखांनी मी कुंभकर्णाला जागे करायला आल्याचे सांगितले. पण ते नेमके कोणाला कुंभकर्ण म्हणत आहेत? ते सरकारला कुंभकर्ण म्हणत असतील तर केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. ते स्वतः सत्तेत असताना सरकारला कसे जागे करणार आहेत, असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.