आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप, सेनेची ५-१० रुपयांत ‘थाळी’ देण्याची घाेषणा ऐकूनच भुका पळाल्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेना प्रस्तुत १० रुपयांत पोटभर जेवण ! - रितेश गायकवाड - Divya Marathi
शिवसेना प्रस्तुत १० रुपयांत पोटभर जेवण ! - रितेश गायकवाड

औरंंगाबाद  - गरिबांना अवघ्या दहा रुपयांत दर्जेदार भाेजनाची थाळी देण्याची घाेषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी निवडणुकीच्या तोंडावर केली, तर दुसरीकडे मित्रपक्षाच्या या लाेकप्रिय घाेषणेला शह देण्यासाठी भाजपही अवघ्या ५ रुपयांत जेवणाची थाळी देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त माध्यमांतून आले आहे. पुन्हा सत्तेवर येण्याचे दावे करणाऱ्या या दाेन्ही मित्रपक्षांच्या घाेषणांचा नेटिझन्सकडून मात्र चांगलाच समाचार घेतला जात आहे.
> ५-१० रुपयांत जेवण मिळण्याच्या घोषणांपासून लोकांच्या भुका पळाल्या पार! खोटं स्वप्न आहे हे. आजपर्यंत काहीच केलं नाही म्हणून फक्त इलेक्शनपुरतं बोलायचं झालं. १० रुपयांत वडापाव किंवा बिस्कीटही नाही येत आज इथे. दहा- पाच रुपयांत थाळी काय मिळणार?
सुभाष शेळके
--------------------------

> मुंबई महापालिका मुख्यालय इमारतीतील कँटीनमध्ये १० रुपयांत जेवण उपलब्ध करून दिलं तरी पावलं, इतरांना मिळणं तर दूरची गोष्ट.
सचिन धनाजी
--------------------------

> जनतेला १० रुपयांत जेवण नको, त्यांना १०,०००/ रुपयांची नोकरी किंवा हाताला काम द्या.. मग ते स्वतः घरी जाऊन आई किंवा बायकोच्या हातचे स्वादिष्ट जेवण खातील. एकीकडे म्हणायचं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आणि दुसरीकडे १० रुपयांत जेवण देऊ असल्या फुटकळ योजना.!
गणेश पवार

याेजना राबवणे तर सहज शक्य आहे !
>उद्धव ठाकरेंची १ रुपयांत आरोग्य तपासणी आणि १० रुपयांत जेवण, ही योजना खरंच चांगली आणि समाजहितकारक आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सबसिडी देण्याची आर्थिक ताकद महाराष्ट्रात नक्कीच आहे. ३२ हजार कोटींची कर्जमाफी शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य देऊ शकते, तर इतकी सबसिडी सहज देऊ शकते.- मनाेज राणे

>१० रुपयांत जेवण म्हणजे बरं होईल... मित्रांना पार्टी देण्याचा खर्च कमी होईल!
- आकाश कुळधरण
 
 

लाेक आळशी हाेतील, आधी काम द्या
१० रुपयांत जेवण आणि १ रुपयात वैद्यकीय चाचणी हे काय पटलं नाही. गोरगरिबांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा. गोरगरीब- भिकारीदेखील स्मार्टफोन वापरत आहेत. त्यांना १० रुपयांत थाळी दिल्यास ते अधिक आळशी होतील. त्यांच्या हाताला काम द्या.- गणेश काेरे
 

> असे कसे जेवणं देणार?  की परत टॅक्सचा पैसा वापरणार? शाळेत खिचडी नीट नाही मिळाली तर हे जेवण कसे चांगले बनवणार?
अजित जाधव
 

> “हॉटेल मातोश्री” :

आमच्याकडे १० रुपयांत पोटभर जेवण मिळेल... - प्रोप्रा. उधोजी राजे  
ऋषिकेश खलाते

​​​​​​​> दहा रुपयांत जेवण म्हणजे सहा लाखांत BMW घेण्यासारखं झालंय. - शुभम गाडेकर

> १० रुपयांत जेवण म्हणजे बरं होईल... मित्रांना पार्टी देण्याचा खर्च कमी होईल! - सतीश पवार

बातम्या आणखी आहेत...