आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांकडे पाहून करत होत्या अश्लील चाळे, मुंबईत शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी दिला चोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- डोंबिवलीमध्ये महिलांकडे पाहून अश्लील चाळे, आक्षेपार्ह वर्तन करणार्‍या एका भामट्याला शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसाच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

 

ही घटना डोबिंवली येथील नांदीवली टेकडी परिसरातील आहे. आरोपी हा इलेक्ट्रॉनिक शॉपचा मालक आहे. आरोपी दुकानाबाहेर उभे राहून जाणार्‍या येणार्‍या महिलांकडे पाहून अश्लील चाळे करत होता. मंगळवारी (ता.8) आरोपीने एका महिलेची छेड काढली. तिने थेट स्थानीय शिवसेना कार्यालय गाठले. तिथे उपस्थित महिला कार्यकर्त्यांना आपबीती सांगितली.

 

चोप दिल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात दिले..

महिलेची तक्रार ऐकून घेतल्यानंतर जवळपास डझणभर महिला कार्यकर्त्या आरोपीच्या दुकानात पोहोचल्या. त्यांनी आरोपीला बाहेर ओढले. नंतर त्याची यथेच्छ धुलाई  केली. काही लोकांनी आपल्या मोबाइल कॅमेर्‍यात या घटनेचा व्हिडिओ शूट केला. नंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...