आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पितृशोक, शिवसेनेच्या माजी खासदाराचे निधन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फलटणचे शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कंदर - फलटणचे लोकनेते शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर (वय 72) यांचे आज रविवार पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर हे दोन पुत्र आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर या त्यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील निवासस्थानाहून सायंकाळी 4 वाजता निघणार असून आणि अंत्यविधी आईसाहेबनगर, फलटण येथे होणार आहे. 15 आगस्ट 1948 रोजी सातारा जिल्ह्यातील शिंदेवाडी येथे निंबाळकर यांचा जन्म झाला. 11 व्या लोकसभेत त्यांनी सातारा मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले होते. त्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रतापराव भोसले यांचा पराभव केला होता.

बातम्या आणखी आहेत...