आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीच्या अजगरासमोर सेनेचा वाघ नंदीबैल झाला; पैठण येथील सभेत खा. अमोल कोल्हे यांची टीका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - देशातील व राज्यातील भाजप सरकारने येथील यंत्रणेचा गैरवापर केला. सीबीआय इतर संस्थेचा वापर केल्याने भाजपत अनेक जण गेले. रोज शिवसेना-भाजप भांडत होती. पाच वर्षे अशीच गेली. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कर्जमाफीचे नाटक केले. मात्र, यांच्या युतीत सडलो म्हणणारी शिवसेना देखील ईडीच्या अजगरासमोर नंदीबैल झाली, अशी टीका करत ईडीला धडा शिकवणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार असून त्यांच्या बरोबर महाराष्ट्राने उभे राहावे, असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दत्तात्रय गोर्डे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. या वेळी आमदार सतीश चव्हाण, माजी मंत्री अनिल पटेल, अप्पासाहेब निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाची मक्तेदारी नसून भाजप-सेना त्यांचे नाव घेऊन सत्तेवर आली. मात्र मुंबईतील त्यांच्या स्मारकाची एक वीट तरी लावली का, त्यांना राज्यातील पूर परिस्थिती व दुष्काळ दिसला नाही. राम मंदिर सांगतात, मात्र  राज्यातील, देशातील वाढती बेकारी, रोजगार प्रश्न, लाखो कंपन्या बंद पडल्या यावर ते काही बोलत नाहीत. मंदिर बांधल्याने हे प्रश्न सुटणार का, आता मतदारांनी याचा जाब विचारला पाहिजे, असेही  डॉ.  कोल्हे म्हणाले.   

वाघचौरे समर्थक नगरसेवक सभेत हजर :  
माजी आमदार संजय वाघचौरे उमेदवारी न मिळाल्याने गोर्डे यांच्या प्रचारात सहभागी झाले नाहीत. त्यांचे समर्थक नगरसेवकही प्रचारात सहभागी झाले नव्हते. मात्र  खा. अमोल कोल्हे यांच्या सभेला नगरसेवक बजरंग लिंबोरे, कल्याण भुकले, डॉ.विष्णू बाबरसह जितु परदेशी व इतर समर्थक सहभागी झाले हाेते.  
 

सरकार १६ हजार शेतकऱ्यांचे मारेकरी

गंगापूर - भाजपकडून सुरू असलेली ‘सर्वोत्तम कामगिरी महाराष्ट्र मानकरी’ ही जाहिरात फसवी असून राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी जबाबदार असणारे हे खरे मारेकरी सरकार आहे, असा घणाघाती आरोप खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी गंगापूर येथील जाहीर सभेत बोलताना केला.  गंगापूर येथील सोमाणी मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार संतोष माने यांच्या प्रचारार्थ आयोजित  प्रचार सभेत ते बोलत होते.