आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यावरुन सांगलीकडे जाणारी शिवशाही बस कात्रज घाटात कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेकजण जखमी  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बस मध्ये 40 प्रवासी होते, 50 फुट खोल दरीत बस कोसळली

पुणे- पुण्यावरुन सांगलीकडे जाणारी एसटी महामंडळाची शिवशाही बस कात्रज घाटात 50 फूट खोल दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातात एका जणाचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरुन सांगलीकडे जाणारे शिवशाही बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुण्याजवळील कात्रज घाट ओलांडून शिंदेवाडीकडे जात असताना अपघात घडला.घाटात बस 50 फुट खोल दरीत कोसळली, बसमध्ये 40 प्रवासी होते. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.