आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवशाही बसच्या दरात कपात, 12 फेब्रुवारीपासून नवे दर लागू होणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- एस.टी.महामंडळाच्या शिवशाही या आरामदायी बसच्या प्रवासी भाड्यात महामंडळाने मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. परभणी ते पुणे या प्रवास भाड्यात तब्बल २६५ रुपये कमी करण्यात आले आहेत. ही नवीन भाडे आकारणी येत्या १२ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. 

 

परभणी-पुणे या मार्गावर प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. परभणी शहरातून जवळपास २५ खासगी ट्रॅव्हल्स दररोज पुण्यासाठी धावतात. त्याही पूर्ण क्षमतेने भरलेल्या असतात. याशिवाय नांदेड व हिंगोलीहून परभणी मार्गे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सची संख्याही मोठी आहे. सणासुदीत अव्वाच्या सव्वा मनाप्रमाणे भाडे आकारले जाते. या पार्श्वभूमीवर एस.टी.ने पुण्यासाठी शिवशाही ही वातानुकूलित स्लीपर गाडी सुरू केल्यानंतर प्रवाशांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले होते. परंतु महामंडळाने या बसचे भाडे परभणी ते शिवाजीनगर पुणेसाठी तब्बल १०५० रुपये इतके आकारले होते. या तुलनेत खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे ७०० ते ७५० असल्याने शिवशाहीला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र होते. याच अनुषंगाने महामंडळाने या भाडेदरात कपात केली आहे. १०५० रुपयांच्या ऐवजी आता ७८५ रुपये भाडे आकारले जाणार आहे. यामुळे २६५ रुपयांची प्रवाशांची बचत होणार आहे. परभणी-अहमदनगरसाठीही पूर्वी ७५० रुपये भाडे आकारले जात होते. नवीन भाडे ६२० रुपये राहणार आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...