आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे चीनी लोकांवर भडकला शोएब अख्तर; म्हणाला - तुम्ही वटवाघूळ, कुत्रे आणि मांजर कसे खाऊ शकता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे आयपीएल 15 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे तर पाकिस्तान सुपर लीगचा कालावधी 4 दिवसांनी कमी केला आहे. पीसीबीने पीएसएल स्पर्धेचा कालावधी 22 मार्च ऐवजी 18 मार्च केला आहे. तसेच इतर सामने लाहोरच्या रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनी लोकांवर भडकला रावळपिंडी एक्सप्रेस


शोएब अख्तर आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला की, "पीएसएल हे रागाचे मुख्य कारण आहे. पाकिस्तानमध्ये क्रिकेट अनेक वर्षांनंतर पुनरागमन झाले आहे. आमच्या देशात पहिल्यांदाच पीएसएल होत आहे आणि आता त्यावरही संकट आहे. परदेशी खेळाडू स्पर्धा सोडून जात आहे. आता ही स्पर्धा रिकाम्या स्टेडियममध्ये होणार आहे." अख्तरने चीनी लोकांच्या जेवणावर टीका करत संपूर्ण विश्वाला धोक्यात टाकल्याचा त्यांच्यावर आरोप केला आहे. तुम्ही वटवाघूळ, कुत्रा आणि मांजर कसे खाऊ शकता, शोएब अख्तरचा सवाल 


अख्तर चीनी लोकांना उद्देशून म्हणाला की, "मला समजत नाही की, तुम्हाला वटवाघूळ सारखे प्राणी का खावे लागतात. त्यांचे रक्त आणि मलमुत्र प्यावे लागते आणि तुम्ही संपूर्ण जगात व्हायरस पसरवतात. मला खरंच कळत नाही की, तुम्ही वटवाघूळ, कु्त्रे आणि मांजर कशी खाऊ शकता. मला खरंच राग आला आहे." पुढे तो म्हणाला की, 'संपूर्ण जग संकटात आहे. याचा पर्यटन क्षेत्राला फटका बसला आहे. आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होत आहे आणि संपूर्ण जग लॉकडाउनकडे जात आहे.'चीनी लोकांना थांबवण्यासाठी कायद्याची आवश्यकता 


शोएब अख्तरने यावर आळा घालण्यासाठी एक नवीन कायदा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला की, "मी चीनी लोकांविरोधात नाही. मात्र प्राण्यांच्या कायद्याविरोधात आहे. मी समजू शकतो की, ती तुमची संस्कृती असेल पण याचा तुम्हालाही फायदा होत नाहीये. ही संस्कृती मानवतेवर घाला घालत आहे. मी असे म्हणत नाही की, चीनी लोकांचा बहिष्कार करा, परंतु काही नियम असावेत. तुम्ही काहीही आणि सर्वकाही नाही खाऊ शकत."

कोरोनामुळे जगभरात 5 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू 


चीनच्या वुहान शहरात उदयास आलेला कोरोना व्हायरस आता 100 पेक्षा अधिक देशांमध्ये पसरला आहे. जगभरात 1 लाख 20 हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला आहे आणि 5 हजारांपेक्षा अधिका लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे 83 प्रकरणे समोर आली आहेत. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...