आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Cup/ पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकचा एकदिवसीय क्रिकेटला अलविदा, विश्वचषकात भारताविरोधात खेळला अखेरचा सामना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - पाकिस्तानने विश्वचषकातल्या आपल्या अखेरच्या सामन्यात बांग्लादेशचा पराभव करत आपला स्पर्धेतील शेवट गोड केला. शोएब मलिकने सामन्याच्या शेवटी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. शोएबला बांग्लादेश विरोधात खेळण्याची संधी देखील मिळाली नव्हती. बांग्लादेशवरील विजयानंतर संपूर्ण संघाने शोएबला सन्मानार्थ निरोप दिला. 

 

 

विश्वचषकात खेळला फक्त 3 सामने 

शोएब मलिकने या विश्वचषकात फक्त तीन सामने खेळले. भारतासोबतच्या सामन्यात लवकर बाद झाल्याने पाकने त्याला पुढील कोणत्याही सामन्यात खेळण्याची संधी दिली नाही. त्याच्या जागेवर हारिस सोहेलला संघात स्थान दिले गेले.

 

कुटुंबीयांना देणार वेळ
पोस्ट मॅच कॉन्फरन्समध्ये निवृत्तीची घोषणा करताना मलिक म्हणाला की, 'मी याअगोदर विश्वचषकानंतर निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. मी खूप दिवसांपूर्वीच शेवटचा वर्ल्डकप खेळण्याचा निश्चय केला होता. मी एकदिवसीय सामन्यांतून निवृत्ती घेत असून याचे मला वाईट वाटत आहे. पण मी आता मला कुटुंबीयांना वेळ द्यायचा आहे.'


गोलंदाज म्हणूनही पार पाडली भूमिका
शोएब मलिकने आपल्या करिअरमध्ये 287 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात त्याने 34.55 च्या सरासरीने 7,534 धावा केल्या आहेत. यात 9 शतके आणि 44 अर्धशतकांचा समावेश आहे. शोएबने गोलंदाजीतही आपली छाप सोडत 158 विकेट्स घेतल्या. शोएबच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये 3 शकते आहे. शोएबने ट्विटरवर संघाचा फोटो पोस्ट करत सोबत खेळणारे सर्व खेळाडू, कोच, मीडिया आणि स्पॉन्सर्सचे आभार मानले.

 

पत्नी सानिया मिर्झाने ट्वीट करून दिल्या शुभेच्छा
निवृत्तीच्या घोषणेनंतर सानिया मिर्झाने देखील शोएबला शुभेच्छा दिल्या. प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो. पण जीवनात प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात होत असते. शोएब तुम्ही देशासाठी 20 वर्ष क्रिकेट खेळलात आणि तुम्ही आजही गर्वाने तेच म्हणत आहात. इजहान आणि मला तुमच्यावर गर्व आहे, असे ट्वीट सानियाने केले. 

बातम्या आणखी आहेत...