आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलक्षण अनुभवाची तिजोरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतातील समुद्र किनाऱ्यांपेक्षा इथला समुद्र एकदमच वेगळा वाटत होता. पाणी हे फक्त निळे किंवा काळपट रंगाचे आजपर्यंत पाहिले होते, पण इथं पाण्याचे अनेक रंग पाहून आश्चर्याचा धक्काच बसला.

 

प्रवासाचा कुठलाच संकल्प न करताच आमचं २०१८ हे साल पर्यटन वर्ष ठरलं. आमच्या आयुष्यात एकदा नव्हे तर चक्क दोनदा अमेरिकेत जाण्याचा योग आला. मुलगी आणि जावयाच्या निमित्तानं. २०१५ ला बोस्टनमधील सर्व ठिकाणं, न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, नायगरा पाहिला. मला पहिल्यापासूनच प्राणी, रम्य निसर्ग याचं आकर्षण, नायगऱ्याचे रौद्र रूप, तरीही नितांत रमणीय रूप डोळ्यात साठवता येत नव्हते. यावर्षी थंडीच्या दिवसांत गेलो. बर्फ पडतानाचा अनुभव घ्यायचाच राहिला होता. खरं म्हणजे डिसेंबरच्या शेवटी तिथं बर्फ पडतो म्हणे, पण निसर्गालाही आपलं रम्य रूप आम्हाला दाखवायची गडबड झाली असावी आणि एकेदिवशी अचानक बर्फ पडू लागला. कापसासारखा पडणारा बर्फ डोळ्यात साठवून ठेवला. बघता-बघता बर्फ हा चहुबाजूंनी परसला आणि सर्व परिसर पांढरा शुभ्र झाला. दुसऱ्या दिवशी बर्फावर चढणं-उतरण खूपच मजेशीर होतं. पहिल्या आठवड्यात अॅपल पिकिंगच्या प्रोग्रॅमचं नियोजन केलं. ऑक्टोबरमध्ये अमेरिकेत झाडांचे रंग बदलतात. वास्तविक ती पानगळच आहे. त्याआधी निसर्गाचे विलक्षण रूप पाहण्यासाठी वार माऊंटला गेलो तिथे हा रंगोत्सव सर्वात सुंदर दिसतो. हे निसर्गाचे वेगळे रूप पाहून सतत वाटत राहतं निसर्गाकडून खरंच खूप शिकायला मिळतं. निसर्गाकडून मिळणारा आनंदही शब्दांत न सामावणारा असतो. त्यानंतर गेलो ते दक्षिण अमेरिकेतील फ्लोरिडाला. क्रुझचा आनंद घेण्यासाठी. आम्ही विमानाने फ्लोरिडातील ऑरलंडोला गेलो. जिथून क्रूझचा सागरी प्रवास सुरू होणार होता. पूर्ण पाच रात्री व चार दिवस आम्ही समुद्रात प्रवास केला.  एक गावच जणू क्रूझवर वसले होते. रात्रभर प्रवास झाल्यानंतर सकाळी सात वाजता क्वेस्ट आयलँडवर पोहोचलो. अतिशय सुंदर रमणीय समुद्रकिनारा लाभलेले हे बेट दक्षिण अमेरिकेचे शेवटचे टोक आहे. बहामा हा देश पाहिला. भारतातील समुद्र किनाऱ्यांपेक्षा इथला समुद्र एकदमच वेगळा वाटत होता. पाणी हे फक्त निळे किंवा काळपट रंगाचे आजपर्यंत पाहिले होते, पण इंथ पाण्याचे अनेक रंग पाहून आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्या सफरीच्या अनुभवाची तिजोरी आजपर्यंत मनात भरून उरली आहे.

बातम्या आणखी आहेत...