आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shobha Vijay Pokharakar Article About Women's Day

महिलांचे स्वावलंबन ‘लिज्जत’चे संघटन!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने भारतातच नव्हे, तर जगभरात आपले नाव कर्तृत्वाने व्यापलेल्या लिज्जत पापडची आठवण सर्वच महिलांसाठी प्रेरणादायी, दिशादर्शक व शक्ती देणारी आहे. सवरेदयी उद्दिष्टे व सहकारी तत्त्वावर गतिमान वाटचाल केलेली र्शी महिला गृह उद्योग लिज्जत पापड ही भारतातील महिलांनी सक्षम व सर्मथपणे चालवलेली संस्था 2014 मध्ये 55 वष्रे वयाची झाली आहे. 15 मार्च 1959 या दिवशी 7 गुजराथी महिलांनी एकत्रित जमून आपल्या घराच्या छतावर सुरू केलेला हा उद्योग आज सातासमुद्राच्या पलीकडे जाऊन भारतीय महिलांनी केलेल्या कर्तृत्वाची साक्ष देत आहे. वार्षिक एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल या संस्थेची आहे. देशात मुंबई मुख्यालयासह 100 पेक्षा अधिक शाखा व विभाग विस्तारलेली ही लिज्जत पापड संस्था उद्योग व्यवसायात आग्रेसर असलेली महिलांची जगातील एकमेव संस्था ठरली आहे.
संस्थेचे नाव लिज्जत ठेवले- सन 1961 मध्ये मालाड (मुंबई) येथे महिला संघटन करून पहिली शाखा सुरू केली. संस्थेला चांगले एक नाव देण्याचे ठरले. यासाठी महिलांचीच स्पर्धा ठेवली. धीरजबेन रूपवाल या महिलेने लिज्जत हे नाव सुचवून बक्षीसही मिळवले. लिज्जत हा गुजराथी शब्द असून मराठीत त्याला लज्जतदार रूचकर, स्वादिष्ट, चटकदार असे पर्यायी शब्द आहेत. महिलांची ही संस्था लिज्जत पापड या नावाने परिचित झाली.
लिज्जतची गतिमान वाटचाल : लिज्जतचे नामकरण होऊन पुढे ते र्शी महिला गृह उद्योग लिज्जत पापड असे झाले. 1962-63 या आर्थिक वर्षात 1 लाख 82 हजार रुपयांची विक्री झाली. शासनाकडे 1960 कलमान्वये संस्थेची नोंदणी केली.
1966 मध्ये खादी विकास व ग्रामीण उद्योग कमिशनने संस्थेला उद्योगाचा दर्जा दिला. त्यामुळे 8 लाख रुपये कर माफी मिळाली. भागभांडवलात चांगली वाढ झाली. सांगली शहरात पहिली शाखा काढली. 1968 मध्ये दुसरी शाखा गुजरातमध्ये काढली. पापडा सोबतच 1974 मध्ये खाकरा निर्मिती सुरू केली. 1975 मध्ये पॅकिंग विभाग सुरू केला. 1976 मध्ये मसाले निर्मिती वाढवली. 1979 मध्ये गहू आटा, वडी व बेकरी उत्पादने सुरू केली. माचिस व अगरबत्ती निर्मिती वाढवली जुलै 88 मध्ये बांद्रा येथे लिज्जत पापड कार्यालयाची अधिकृत सुरुवात झाली. ससा डिटर्जंट व साबूनवडी निर्मिती चालू केली, अशी विकासाची मेट्रो सुसाट धावली.