आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Picnic साठी निघाले होते चिमुकले, Truck ने दिली इतकी जोरदार धडक की चिंधळ्या उडाल्या; 3 मुलांसह 5 शिक्षिकांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूर - पिकनिकसाठी निघालेल्या एका कारला भरधाव ट्रकने इतकी जोरदार धडक दिली की चिमुकल्यांच्या चिंधळ्या उडाल्या. या कारमध्ये लहान-लहान मुले आपल्या शिक्षिकांसह जात होते. अपघात इतका भीषण होता की 3 मुले आणि 5 शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना उदयपूरच्या जयसमंद-सलूंबर रोडवर शनिवारी (13 ऑक्टोबर) रोजी घडली आहे. या अपघातात इतर 2 मुले आणि 1 शिक्षिका जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


स्थानिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, डाया गाव येथील खासगी शाळेच्या 6 लेडी टीचर आणि 5 मुले उदयपूरच्या दिशेने पिकनिकसाठी निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या कारला एका भरधाव ट्रकने धडक दिली. घटनास्थळावरील छायाचित्रांमध्ये त्या मुलांच्या कारखाली फक्त आणि फक्त रक्त दिसून येत आहे. कारचा समोरील भाग पूर्णपणे दबला आहे. तर आतमध्ये असलेल्या मुलांसह शिक्षिकांचा चेंदामेंदा झाला. ही कार एक लेडी टीचर प्रेक्षा चौधरी चालवत होत्या. अपघातात जखमी झालेल्या 3 जणांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बातम्या आणखी आहेत...