आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking Cctv Footage Four Women Kicking Pregnant Lady In Womb Had To Abort Baby

लज्जास्पद Video: 4 महिलांनी गर्भवती तरुणीच्या पोटावर मारल्या लाथा-बुक्क्या, करावा लागला गर्भपात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - माणुसकीला काळीमा लावणारा हा लज्जास्पद व्हिडिओ पंजाबमध्ये एका सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका गर्भवती तरुणीला 4-4 महिला मारहाण करताना दिसून येत आहेत. या महिलांना हेही माहिती आहे की ती तरुणी गर्भवती आहे. तरीही त्या इतक्या क्रूर बनल्या की मुद्दाम त्यांनी तिच्या पोटाला टार्गेट गेले. सर्व महिला तिच्या गर्भाला लाथा मारत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. पीडित तरुणीने या अतिशय किळसवाण्या घटनेची पोलिसांत तक्रारही केली. परंतु, पोलिसांनी आरोपी महिलांना अटक करणे सोडून दोन्ही पक्षांत समेट घडवून आणण्यावरच भर दिला. त्याच दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सीसीटीव्ही पाहून पोलिसांना अखेर विवश होऊन कारवाई करावीच लागली. 


काय आहे प्रकरण?
> पीडित तरुणीचे नाव कंवलजीत कौर असून ती अमृतसरच्या फैजपुरा येथील रहिवासी आहे. कंवलजीतचा दोष इतकाच की ती आपल्या एका मैत्रिणीचा संसार वाचवण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, आपल्या मैत्रिणीच्या मदतीमुळे तिला आपल्या पोटातील बाळ गमवावे लागले. 
> कंवलजीतची मैत्रिण रंजना हिच्या पतीचे गीता नावाच्या एका तरुणीशी विवाहबाह्य संबंध होते. तिने गीता मैत्रिणीला पकडले होते. यानंतर कंवलजीतने रंजनाची भेट घेतली. तसेच मैत्रिणीला गीता संदर्भात संपूर्ण माहिती दिली. कंवलजीतने केलेल्या गौप्यस्फोटानंतर रंजनाच्या घरात खूप धिंगाणा झाला.
> रंजनाचा पती आणि आपल्यात अफेअरची माहिती कंवलजीतनेच समोर आणली असे गीताला कळाले. यावर गीता इतकी संतापली की ती आपल्या मैत्रिणींना घेऊन थेट कंवलजीतकडे पोहोचली. त्या सर्वांनी मिळून 4 महिन्यांची गर्भवती असलेल्या कंवलजीतच्या पोटात लाथा-बुक्क्या हाणल्या. गंभीर अवस्थेत कंवलजीतला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी तिच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. दरम्यान, सर्वच आरोपी महिला फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...