आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाचताना डोक्यावर पडला; किनगावात तरुणाचा मृत्यू; डोक्यावरील जखमेकडे दुर्लक्ष करणे जिवावर बेतले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- किनगाव येथे बँडच्या तालावर नाचताना, तोल जाऊन डोक्यावर पडल्याने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे संबंधित तरुणाने जखमेकडे दुर्लक्ष केले. जखमी अवस्थेत रात्री झोपी गेलेला तरूण मंगळवारी सकाळी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. चेतन शरद पाटील (वय २८)असे मृताचे नाव आहे. 

 

किनगावात सोमवारी हजरत मलंगशाह बाबा यांचा संदल होता. संदल मिरवणुकीत बँड पथक सहभागी झाले होते. मिरवणुकीत चेतन पाटील हा तरुण मित्रांसोबत नाचत होता. नाचताना तोल गेल्याने तो डोक्यावर पडला. या घटनेत त्याच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. रात्री उशिरा घरी परतल्यानंतर तो झोपून गेला. सकाळी त्याची पत्नी उठवण्यासाठी गेल्यानंतर तो मृत झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली. मृताच्या आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. मृत चेतन गावातील किराणा दुकानात मजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालवत होता. मंगळवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

बातम्या आणखी आहेत...