आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानशा खोलीत खोदकामादरम्यान सापडले दोन महिला आणि तीन मुलांचे सापळे, शेकडो वर्षांनंतरही होते जसेच्या तसे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॉम्पेई - इटलीमध्ये खोदकामादरम्यान 5 जणांचे सापळे सापडले आहेत. जवळपास 1900 वर्षांपासून ते जमिनीमध्ये पुरले गेलेले होते आणि त्यांना कोणी हातही लावला नसावा असे सांगण्यात येत आहे. पुरातत्व खात्याच्या मते, हे पाच जण ईसवीसन 79 मध्ये माऊंट वेसुवियस फुटल्याने त्यापासून संरक्षण व्हापे म्हणून या लहानशा खोलीत लपले असतील. पण ज्वालामुखीच्या आगीने त्यांचाही खात्मा केली. या पाचही जणांनी एकमेकांचे हात पकडले असताना घराचे छत कोसळले आणि हे पाचही जण त्याखाली दबले गेले. 


सुरक्षित ठिकाणाच्या शोधामुळे गेला जीव 
- पॉम्पेई शहरातील एका पुरातत्व तज्ञाने एक शॉकिंग डिस्कव्हरी केली. त्यात त्याने एका घराचे खोदकाम करत एका लहानशा खोलीतून पाच मानवी सापळे काढले. ज्वालामुखीच्या आगीत होरपळून यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्वालामुखीपासून सुरक्षित राहण्यासाठी ते येथे लपले असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पुरातत्व तज्ज्ञांच्या मते, घराला आगीची झळ पोहोचली आणि त्यामुळे घराचे छत जळून खाली कोसळले आणि पाच जणांचा दबून आणि होरपळून मृत्यू झाला. 


इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे 
पॉम्पेई आर्कियॉलॉजिकल साइटचे डायरेक्टर मॅसिमो ओसान्ना यांच्या मते, हा अत्यंत धक्कादायक शोध आहे. इतिहासासाठीही हा अथ्यंत महत्त्वाचा आहे. शेकडो वर्षांनंतर हे सापळे जसेच्या तसे आहेत. कोणीही त्याला हात लावलेला नाही. इतिहासकारांच्या मते या खोदकाम आणि शोधामुळे त्यांना पॉम्पेई या रोमन शहराला उध्वस्त केलेल्या त्या नैसर्गिक संकटाबाबात माहिती मिळाली. खोदकामातून मिळालेल्या पुराव्यावरून या नैसर्गिक संकटाची तारीखही शास्त्रज्ञांना मिळाली आहे. त्यानुसार 24 ऑगस्ट 79 ईसवीसन रोजी ही घटना घडली होती. 

बातम्या आणखी आहेत...