आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या इमारती पाडून नव्या बांधत होते सरकार, ढिगारे हटवल्यानंतर सुरू केले खोदकाम, तेवढ्यात लागला दगड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवसेहिर - तुर्कस्तानच्या नेवसेहिर प्रांतात काही वर्षांपूर्वी जुनी घरे तोडून नव्या इमारतींसाठी जागा तयार केली जात होती. मशीनद्वारे त्याठिकाणी खोदकाम सुरू होते. त्याचवेळी अचानक मशीन कशाला तरी धडकल्या. खाली नेमके काय आहे हे पाहण्यासाठी इंजिनीअर त्याठिकाणी पोहोचले.  ढिगारे हटवायला सुरुवात करताच त्यांना आश्चर्य वाटले, कारण जमिनीखाली एक सुरुंगासारखा रस्ता होता. 


खोदकाम थांबवून जेव्हा ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले तेव्हा लांबच लांब सुरुंग आढळले. रडारमुळे लक्षात आले की हा सुरुंग जवळपास 7 किलोमीटर लांबीचा होता. इंजिनीअर जेव्हा या सुरुंगाच्या मार्गाने पुढे गेले तेव्हा समोरचे चित्र पाहून त्यांना धक्काच बसला. 


सुरुंगातून गेल्यानंतर एक अंडरग्राऊंड शहरच आढळळे. पुरातत्व खात्याच्या जत्ज्ञांना बोलावल्यानंतर समजले ही त्याठिकाणी पाच हजार वर्षांपूर्वी अंडरग्राऊंड शहर बसवलेले होते. जमिनीखाली जवळपास 371 फूट खोल हे शहर तयार केलेल होते. 


पुढे वाचा, या गूढ शहराबाबत आणखी काही गोष्टी.. 

बातम्या आणखी आहेत...