आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलमधून निघाल्यानंतर गप्पा मारत होत्या डॉक्टर आणि नर्स, अचानक घडले असे काही की जमिनीत शिरल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुर्कस्तान - शहरातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. येथील एक महिला डॉक्टर आणि नर्स त्यांची कामे संपवून हॉस्पिटलमधून बाहेर निघाल्या होत्या. दोघी अगदी निश्चिंतपणे रस्त्याच्या कडेला उभ्या राहून गप्पा मारत होत्या. पण अचानक असे काही घडले की, त्या जागेवर जमिनीमध्ये खाली गेल्या. त्यांना स्वतःला सावरायलाही संधी मिळाली नाही. हॉस्पिटलच्या बाहेर लावलेल्या एका कॅमेऱ्यात हे दृश्य कैद झाले. 


सिंकहोलमध्ये गेल्या.. 
मीडिया रिपोर्ट्सनुसार या दोघी डॉक्टर सुझान बलिक आणि नर्स ओजलेम डुमाज होत्या. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अचानक एक धमाका झाला आणि त्यांच्या पायाखालची जमीन अक्षरशः नाहीशी झाली आणि त्या सिंकहोलमध्ये पडल्याचे दिसले. 


वाचवण्यासाठी धावले लोक 
ही घटना पाहून काही अंतरावर उभे असलेले लोकही घाबरले. ते वेगाने महिलेला वाचवण्यासाठी पोहोचले. ढिगाऱ्याखाली दबूनही दोघींचा जीव वाचला आणि त्यांना किरकोळ जखमा झाल्या. पोलिस घटनेचा तपास करत आहेत. तज्ज्ञांच्या मते जमिनीखालील पाण्यामुळे भूस्खलनाचे असे प्रकार घडत असतात. 

 

बातम्या आणखी आहेत...