आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा धक्कादायक प्रकार, चौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सध्या सर्वत्र निवडणुकीची धामधुम सुरू आहे. सर्व राजकीय पक्षातील नेते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागत आहेत. पण, अशातच एक चकित करणारे प्रकरण समोर आले आह. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आल्याचे समोर आले आहे. निवडणुकीत असा प्रकार घडला असल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे.राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना स्थानिक संस्कृतीसोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी शिक्षण विभागाने "आंतरराष्ट्रीय" असे नामकरण केले. त्यासाठी महाराष्ट्र राज्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचीही स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी पुस्तकांविनाच चालणाऱ्या या शाळांसाठी यंदा पहिली ते चौथीची पुस्तके ऑगस्ट महिन्यात छापण्यात आली. पण त्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्यात आला आहे.शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांनीही या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकण्याचा भाजपचा कट-धनंजय मुंडे
शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार करण्यात आल्याने विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर कडाडून टीका केली आहे. "हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीयांचा जाज्वल्य अभिमान असलेल्या शिवछत्रपतींचा घोर अपमान उठता बसता छत्रपतींचे नाव घेणाऱ्या सरकारनेचा केला आहे. गेल्या 50 ते 60 वर्षांपासून चौथीच्या पाठ्यपुस्तकातील छत्रपतींवरील धडा वगळण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चूकीचा आणि अपमानास्पद असल्याचे सांगितले तसेच छत्रपतींवरील धडा वगळू नये, या विधिमंडळाने केलेल्या ठरावाचेही उल्लंघन या सरकारने केल्याची टीका त्यांनी केली. महाराजांचा इतिहास जनमानसातून पुसून टाकण्याच्या भाजपाचा हा कट असल्याचे म्हणत शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या भाजपला 21 तारखेला धडा शिकवल्या शिवाय जनता आता स्वस्थ बसणार नाही", असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...