Home | National | Other State | shocking gangrepe of a minor 16year old near tilihar lake in rohtak haryana

मित्रासोबत फिरायला गेलेल्या 16 वर्षीय मुलीला 2 मुलांनी किडनॅप करून केला बलात्कार; पोलिसांच्या दुर्लक्षामुळे घडली घटना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 10:45 AM IST

नराधमांनी बलात्कार केल्यानंतर आणखी दोन मित्रांना बोलवले

  • shocking gangrepe of a minor 16year old near tilihar lake in rohtak haryana

    रोहतक (हरियाणा) - रोहतक शहरातील एकमेव पर्यटन स्थळ तिलीयार सरोवर सुरक्षित नाही. तिलीयार सरोवराजवळ गुरुवारी सायंकाळी 4 वाजता मित्रासोबत फिरायला आलेल्या एका 16 वर्षीय मुलीचे दोन तरुणांनी मित्राला मारहाण करून अपहरण केले. तिच्या मित्राने थोड्या दूर अंतरावर बसलेल्या युवकांकडे मदत मागितली आणि पोलिसांना कळवले. पण पोलीस मात्र त्याच्या बोलण्यावरच संशय घेत राहिले.

    पोलिसांच्या तपासानुसार आरोपी विपिन आणि त्याचा साथीदार तिलियार तलावाजवळ दारू पीत होते. त्याचवेळी मुलगी तिचा मित्र अजय बरोबर तेथे फिरण्यासाठी आली होती. दरम्यान आरोपींनी अजयला मारहाण केली आणि मुलीला बाईकवर बसवून तलावापासुन 1 किमी दूर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांचे साथीदार नीरज आणि प्रवेश यांना फोन करून बोलावले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी मुलीला शीला बायपासवर सोडून पोबारा केला. मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून, तिचा मित्र अजयवर फुस लावून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असून शुक्रवारी तीन मुलांना अटक केली आहे. तर एक अद्यापही फरार आहे. पोलिसांनी सुरुवातीपासून हे प्रकरण गंभीरपणे घेतले असेल तर कदाचित मुलगी त्या नराधमांपासून वाचली असती.

Trending