20 वर्षीय तरुणीवर / 20 वर्षीय तरुणीवर मागील 1 वर्षांपासून अत्याचार करत होते नराधम; 7 महिन्यांची गरोदर राहीली तेव्हा तिला सांगितले, कोणी विचारले तर सांग पोटाचा कँसर झालाय... 

दिव्य मराठी वेब टीम

Jan 22,2019 12:17:00 AM IST

बठिंडा- मंगा सिंग यांची हत्या करणारे आरोपी जगजित सिंग जग्गा पटवारी आणि जग्गा सिंग बॅरोके यांचा आणखी एक गुन्हा समोर आला आहे. हे दोन्ही आरोपी मृत मंगा सिंग यांच्या कुटुंबातील 20 वर्षीय तरुणीवर मागील एक वर्षापासून अत्याचार करत होते. पीडित तरुणी 7 महिन्यांची गरोदर आहे. दोन्ही आरोपी तरुणीच्या अख्या कुंटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत गेल्या अनेक महिन्यांपासून तिच्यावर अत्याचार करत होते. मंगा सिंग यांच्या हत्येच्या आरोपाखाली दोघा नराधमांना अटक झाल्यानंतर तरुणीने धक्कादायक खुलासा केला.

नथाना पोलिसांनी पीडित तरुणीचा जबाब नोंदवून जगजित सिंग जग्गा पटवारीसह जग्गा सिंग बॅरोकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर पीडितेला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. परंतू पीडित तरुणीच्या नातेवाईकाने तक्रार केल्यानुसार, ते तरुणीवर उपचार करण्यासाठी पोलिसांसोबत रात्री साडेतीन वाजता हॉस्पिटलमध्ये पोहचले होते. परंतू डॉक्टर उशिरा पोहचल्याने तरुणीवर उशिरा उपचार सुरू झाले.

तरुणीने पोलिसांना दिला जबाब
हॉस्पिटलमध्ये पीडित तरुणीने पोलिसांना सांगितल्यानुसार, जग्गा सिंग बॅरोके अनेक वर्षांपासून पीडित तरुणीच्या घरी राहत होता. जग्गा सिंग बॅरोके आणि जगजित सिंग जग्गा पटवारी मागील एक वर्षांपासून तरुणीवर अत्याचार करत होते. तरुणीने त्याचा विरोध केल्यास ते तिच्या कुटुबियांना जिवे मारण्याची धमकी देत होते. पीडितेने सांगितल्यानुसार, दोघे आरोपी तिला बठिंडापरिरसात नेऊन तिच्यासोबत दुषकृत्य करत होते. तीन महिन्यांआधी ती गरोदर असल्याचे समजताच त्यांनी तिला गर्भपात करण्याचे किट आणून दिले. त्यानंतरही तिचे पोट दिसू लागले तेव्हा आरोपींनी तिला पोटाचा कँसर होण्याची धडकी भरवली. परंतू दोघा आरोपींनी नातेवाईकाची हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. तेव्हा तरुणीने स्वत:वरील आपबीती पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करुन दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

X
COMMENT