Home | Business | Industries | Shocking : Google Plus Service will shut down from April 2, 2019

या तारखेपासून बंद होईल गुगलची ही खास सेवा; युझर्सला ई-मेलने पाठवल्या सुचना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 03, 2019, 02:53 PM IST

आता हे अकाउंट नाही वापरु शकणार युझर्स, या तारखेच्या आत डाउनलोड करा तुमचे फोटो आणि व्हिडिओ

 • Shocking : Google Plus Service will shut down from April 2, 2019

  नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगलने यावर्षी आपली खास सेवा 'Google+'ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गुगलने तयारी सुरू केली असून 'Google+'च्या युर्झसला ई-मेलने सुचना पाठवल्या आहे. गुगलकडून पाठवण्यात येणाऱ्या ई-मेलनुसार, 2 एप्रिलपासून 'Google+' बंद होणार असून त्यावरील अकाउंटदेखील बंद होणार आहे.

  डाउनलोड करुन घ्या फोटो आणि व्हिडिओ
  गुगलने डिसेंबर 2018 ला 'Google+' सेवा बंद करणार असल्याची घोषणा केली होती. गुगलने सांगितल्यानुसार, 'Google+'च्या सर्व युर्झसला 2 एप्रिलच्याआधी अकाउंटवरील सर्व फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करावे लागावे लागणार आहे. अन्यथा अकाउंटसोबत सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलिट होणार आहे.

  पुढील स्लाइडवर वाचा- यामुळे बंद होणार 'Google+' सेवा

 • Shocking : Google Plus Service will shut down from April 2, 2019

  यामुळे बंद होणार 'Google+' सेवा
  गुगलने सांगितल्यानुसार, युझर्स 'Google+'च्या सेवांचा कमी वापर करत आहे. त्यामुळे 'Google+'च्या सेवांना मेंटेन करण्याच्या समस्येमुळे ही सेवा बंद होणार आहे.  

   

  पुढील स्लाइडवर वाचा- क्रमाक्रमाने बंद होतील 'Google+'च्या सेवा

 • Shocking : Google Plus Service will shut down from April 2, 2019

  क्रमाक्रमाने बंद होतील 'Google+'च्या सेवा
  'Google+'च्या सेवा क्रमाक्रमाने बंद होणार आहे. युझर्सला 4 फेब्रुवारीपासून 'Google+'वर कोणतेही पेज, प्रोफाइल, कम्युनिटी किंवा इव्हेंट क्रिएट करता येणार नाही. परंतू काही आठवड्यानंतर 'Google+'चे Sign in बटन कार्य करणे बंद होईल. त्यानंर ब्लॉगर कोणतीही कमेंट करु शकणार नाही. अशाप्रकारे 'Google+'च्या सर्व सेवा बंद होणार आहे. त्यामुळे तुम्ही आजच तुमच्या अकाउंटवरील सर्व फोटो आणि व्हिडिओ डाउनलोड करुन घ्या. 

   

Trending