आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी तरुणीला डांबून ठेवत सिगारेटचे चटके; उद्याेजकाच्या मुलाला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या इराणी तरुणीला महिनाभर डांबून ठेवत तिच्या प्रियकराने मारहाण केली. तसेच त्याने तरुणीचा अमानुष छळ करत तिला सिगारेटचे चटकेही दिल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी उद्याेगपतीचा मुलगा व एका अभिनेत्री नगमाच्या चुलत भावाला अटक केली आहे. संबंधित तरुणीने इन्स्टाग्रामवर या प्रकाराची माहिती मैत्रिणीला दिल्यावर एका महिला पत्रकाराने कोरेगाव पार्क पोलिसांच्या मदतीने तिची सुटका केली. 

 

धनराज अरविंद मोरारजी (रा. मित ऑलम्पस सोसायटी, कोरेगाव पार्क) असे तरुणाचे नाव आहे. तक्रारदार तरुणी मूळ इराणमधील तेहरान शहरातील रहिवासी आहे. तिने हॉटेल व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. इराणमध्ये तिने काही काळ काम केले. त्यानंतर ती वर्षभरापूर्वी विद्यार्थी व्हिसावर भारतात आली. पुण्यातील महात्मा गांधी रस्त्यावरील एका संस्थेत तिने संगणक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. दरम्यान, इराणमधील मैत्रिणीच्या माध्यमातून तिची एका पार्टीत धनराजशी ओळख झाली होती. 

 

प्रेम आणि खर्चाचे दाखवले आमिष 
धनराजची तरुणीशी ओळख झाल्यानंतर त्याने तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. भारतात राहण्याचा खर्च तसेच पुण्यातील निवासाची व्यवस्था करण्याचे आमिष त्याने दाखवले. त्यामुळे ती धनराजसाेबत कोरेगाव पार्क भागातील सदनिकेत राहत होती. काही दिवसांतच त्याने तिच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. तो तिला मारहाण व सिगारेटचे चटके देत होता. तिने घरातून बाहेर पडू नये म्हणून त्याने कुत्रे दारात बांधून ठेवले होते. दरम्यान, धनराज याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...