आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इटारसी- शहरात प्रेमप्रकरणातून आरोपीने चाकूने वार करुन तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सौरभ कहार असे आरोपीचे नाव असून शुभम राजपूत मृत तरुणाचे नाव आहे. 31 डिसेंबरला दुपारी 1 वाजता पीपल परिसरात ही घटना घडली असून हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होवून मृतदेहाला ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करुन आरोपी सौरभला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी म्हणाला, तो वारंवार प्रेमसंबंधात बाधा बनत होता
पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी सौरभ मृत शुभमचा मित्र होता. परंतू मृत सौरभ वारंवार आरोपी शुभमच्या प्रेमसंबंधात बाधा बनत असल्याने दोघांमध्ये वाद सुरू होते. यातूनच आरोपी शुभमने रागाच्या भरात सौरभची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सीसीटिव्हीत कैद झाली हत्या
या घटनेचा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे सुरवातीला दोघांमध्ये झटापट झाली. त्यानंतर आरोपी सौरभने मृत शुभमवर 11 वेळा चाकूने वार केल्याने तो रक्तभंबाळ अवस्थेत जमिनिवर कोसळला. त्यानंतरही आरोपी सौरभने चाकूने शुभमचा गळा चिरला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने मृत शुभमचा जागेवरच मृत्यू झाला.
डॉक्टरांनी सांगितले, मृत शुभमच्या देहावार केले 11 वेळा वार
डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी सांगितल्यानुसार, मृत शुभमच्या देहावर जवळपास 11 वेळा वार करण्यात आले असून गळ्यावरही मोठा घाव आहे. यामुळेच मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपुर्ण शहरात तणावाचे वातावरण असून मृत शुभमच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी मृत शुभमच्या कुटुंबियांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.