आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक वर्षाच्या मुलीचे आजीसोबत तुरुंगात जाणार बालपण; आईच्या हत्येवरून बाप- आजी-आजोबा आहेत तुरुंगात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पानिपत- ही व्यथा आणि कथा आहे एक वर्षाच्या मुलीची. तिला नाइलाजाने आपले बालपण तुरुंगात घालवावे लागत आहे. तिचा दोष इतकाच आहे की, ती सहा महिन्यांची असताना, तिची या जगातून गेली. आईला हुंड्यासाठी छळ करून मारले, या गुन्ह्यात तिचा बाप, आजोबा व आजीला जामीन मिळाला नसल्याने ते सहा महिन्यापासून तुरुंगात आहे. न्यायालयाने अद्याप या अारोपाखाली शिक्षा दिलेली नाही.  

 

दरम्यान, मुलगी घरात एकटीच उरली. तिचे पालन-पोषण करणारा कोणी उरला नव्हता. म्हणून ६ महिन्यांपूर्वी तिला अनाथालयात ठेवण्यात आले. आता आजीच्या याचिकेवर सुनावणी घेऊन आजीसोबत तिलाही तुरुंगात ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. बाल कल्याण समिती व पोलिस मुलीला घेऊन हरियाणातील कर्नाल तुरुंगात गेले होते.  


आईच्या मृत्यूमुळे सहा महिन्यांची मुलगी झाली एकाकी, दुसऱ्या आजोबाचा नकार  
सोनिपतच्या मुरथल येथील एका तरुणीचे लग्न डिसेंबर २०१५ मध्ये छाजूगढी येथील एका तरुणाशी झाले. लग्नानंतर तरुणीस एक मुलगी झाली. ८ मे २०१८ रोजी तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. तरुणीच्या वडिलांनी समालखा पोलिस ठाण्यात  हुंड्यासाठी पती, सासू व सासऱ्याने विष पाजले, अशी फिर्याद दिली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली, तर फिर्यादीने मुलीस स्वीकारण्यास नकार दिला. आजीच्या अटकेनंतर घरात ती एकटी नात उरली. तिला २५ जून २०१८ रोजी बाल कल्याण समितीकडे सोपवण्यात आले होते.  

 

केअर टेकरलाच आई  समजते 
समिती सदस्य किरण मलिक व सरोज आट्टा यांनी सांगितले, मुलगी त्यांच्याकडे आणली तेव्हा ती सहा महिन्यांची होती. ९ जुलै रोजी तिला कॅथल शिशू गृहात ठेवण्यात आले. तेथे केअर टेकरने तिचा सांभाळ केला. आता ती तिलाच आपली आई मानते. तिच्यासोबतच खेळते. केअर टेकर सोमवारी मुलीस घेऊन लघु सचिवालयाजवळील चौथ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात गेली. तेथेही ती केअर टेकरसोबत खेळत होती. नंतर मुलीला समितीच्या स्वाधीन करण्यात आले. ती आता आश्रयगृहात आहे. तिचा सांभाळ चांगल्या प्रकारे होत असला तरी दुर्दैवाने तिला अनाथ व्हावे लागले. 

 

हायकोर्टाच्या आदेशावरून मुलीस  तिच्या आजीकडे दिले  
समिती सदस्य किरण मलिक यांनी सांगितले, हुंडाबळी प्रकरणात हत्येच्या आरोपावरून आजी कर्नाल तुरुंगात आहे. तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन मुलीला आपल्या ताब्यात देण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने १० डिसेंबर रोजी आजीच्या हवाली करण्याचे आदेश दिले. आदेशाची प्रत पानिपत पोलिस अधीक्षकांना पाठवण्यात आली. कागदपत्रांची कार्यवाही पूर्ण होताच मुलीला हरियाणातील कर्नाल तुरुंगात नेण्यात आले. दोन दिवस ती आश्रयगृहात होती.

बातम्या आणखी आहेत...