आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच कुटुंबातील अपघातात ठार 7 जणांना एकाच चितेवर भडाग्नी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब- मुलाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली. नागपूर मार्गावर सोमवारी रात्री घडलेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. त्यात नवऱ्या मुलाच्या कुटुंबातील ७ जणांचा समावेश होता. या सर्व ७ जणांचे मृतदेह एकाच सरणावर ठेऊन त्यांना भडाग्नी देण्यात आला.  

 

कळंब तालुक्यातील पारडी सावळापूर येथील नितीन थुलचा यवतमाळातील शकंरराव कांबळे यांच्या मुलीसोबत विवाह ठरला होता. सोमवारी यवतमाळमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने  पारडी येथून थुल कुटुंबीय नातेवाईकांसह यवतमाळला गेले होते. कार्यक्रम आटोपून परत येताना चापर्डा गावाजवळ रात्री त्यांच्या क्रुझरला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात १० जण ठार झाले. 

 

मृतांमध्ये क्रुझरचा चालक सचिन बाबाराव पिसे (२५ वर्षे), नितीनचे वडील रमेश पुडलीक थुल (५७), आई सुशीला, (५०), वहीणी अर्पिता, (३३), पुतण्या सक्षम प्रशांत थुल (५), मोठे वडील तानबाजी थुल (६२) बहीण सोनू शैलेश बोंदाडे (३३) भाची सानिया बोंदाडे (१२ रा. पिपळगाव) चुलत भाऊ सुनील ताणबाजी थुल (३२, रा. वर्धा) मामा जानराव झामरे ♦(५५ रा. आसेगाव) यांचा समावेश आहे.  

 

बातम्या आणखी आहेत...