आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking News: Bride Flew Away With Cash And Jewelery On After 15 Days Of Wedding

विवाहाच्या पंधरा दिवसांतच समोर आले पत्नीचे खरे रुप; संपूर्ण तपास केला तेव्हा कुटुंबावर आली पश्चाताप करण्याची वेळ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- शहरात जीवनसाथी डॉट कॉम या विवाह जुळवणाऱ्या वेबसाइटच्या मदतीने एका तरुणीने तरुणाला लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अनीषा असे या आरोपी तरुणीचे नाव असून काही दिवसांपू्र्वी तिने वेबसाइटच्या मदतीने एका तरुणाला आपण राजपूत असल्याची खोटी माहिती सांगून विवाह केला. विवाहाच्या पंधरा दिवसानंतरच ती घरातील मौल्यवान दागिने, महागडे कपडे आणि काही पैसे घेऊन पसार झाली. दरम्यान ही बाब पिडीत तरुणाच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

 

विवाहाच्या 15 दिवसांतच घरातील दाग-दागिने घेऊन पसार
पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी अनिषाने जीवनसाथी डॉट कॉमच्या मदतीने तरुणाला विवाहासाठी रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्याचवेळी दुबईला राहणाऱ्या तरुणाने त्याच्या कुटुबियांना आरोपी अनिषा घरी येणार असल्याचे सांगितले. दोघांची चांगली ओळख झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी विवाह केला. त्यानंतर विवाहाच्या 15 दिवसांनी पिडीत तरुण कामानिमित्त दुबईला गेला असता आरोपी मनिषाने संधी साधून घरातील सर्व दागिने, मंगळसूत्र, सोने, महागडे कपडे लंपास केले.


वेबसाइटवर राजपूत असल्याची खोटी माहिती
पोलिस तपासात समोर आल्यानुसार, आरोपी अनिषा जम्मू कश्मिर येथील मुस्लिम रहिवासी आहे. अमहद मुश्ताक असे तिच्या वडिलांचे नाव असून ते पोलिस कर्मचारी आहे. आरोपी अनिषाने याआधीही अनेक तरुणांना लग्नाच्या जाळ्यात अडकून त्यांची लूट केल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...