आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहाप्रसंगी बहिणींच्या पाठवणीवेळी अश्रू ढासाळत होता भाऊ; अचानक बिघडली तब्येत.. गावावर पसरली शोककळा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाली- विवाहाप्रसंगी एकाच कुटुंबातील चार बहिणींच्या पाठवणी वेळी अश्रू ढासळणाऱ्या भावाची तब्येत खराब होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजू असे या तरुणाचे नाव असून तो एकुलता भाऊ होता. तब्येत खराब झाल्यानंतर त्याला तातडीने रुग्नालयात दाखल केले. परंतु चार दिवसांतच त्याचा मृत्यू झाला. पाली जिल्ह्यातील डेंडा या गावात ही दु:खदायक घटना घडली असून सध्या संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

 

बहिणींना निरोप देताना भाऊक झाला एकुलता एक भाऊ

रहिवाशांनी सांगितल्यानुसार, डेंडा गावातील रहिवासी मोहनदास वैष्णव यांना 5 मुली आणि 1 मुलगा होता. 13 डिसेंबरला मोहनदास यांच्या चार मुलींचा विवाह ठरला होता. विवाहाच्या सर्व प्रथा पार पाडल्यानंतर मोहनदास यांचा एकुलता मुलगा आपल्या चार बहिणींना अखेरचा निरोप देत होता. बहिणींना निरोप देताना भाऊक होवून अश्रू ढासाळत होता. दरम्यान अचानक त्याची प्रकृती अचानक खराब झाली असता त्याला तातडीने रुग्नालयात दाखल केले. परंतू प्रकृती अधिकच खालावल्याने चौथ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. 

 

भावाने सांगितले होते, चौघींच्या सासरी येईल, परंतू भावालाच अखेरचा निरोप देण्यासाठी पोहचल्या बहिणी
13 डिसेंबरला बहिणींच्या विवाहाप्रसंगी लाडक्या बहिणींना निरोप देताना मृत राजू खूपच भाऊक झाला होता. त्यावेळी त्याने बहिणींना सांगितले होते की, लवकरच चौघींच्या सासरघरी बहिणींना भेटण्यासाठी येईल. परंतू चारच दिवसांत त्याचा मृत्यू झाल्याने मोहनदास यांचे कुटुंब आणि बहिणींच्या सासरवर शोककळा पसरली आहे. सध्या संपूर्ण जिल्ह्यात याविषयी चर्चा सुरू असून सर्वजण या कुटुंबाविषयी दु:खद भावना व्यक्त करत आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...