आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनमध्ये तरुणाला होती दुर्गंधी सॉक्सचा वास घेण्याची सवय; तब्येत बिघडल्याने हॉस्पिटलमध्ये केले दाखल, रिपोर्ट पाहून डॉक्टरही झाले हैरान...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन- चीनमध्ये एका तरुणाच्या किळसवाण्या सवयीमुळे त्याच्या फुफ्फुसांत इंफेक्शन झाल्याचा विचित्र प्रकार समोर आला आहे. चीनमधील झेंगझाउ शहरातील रहिवासी पेंग (वय 37) असे या तरुणाचे नाव असून अनेक दिवसांपासून त्याच्या छातीत वेदना होत होत्या. त्यानंतर अचानक त्याला श्वास घेणे कठीण झाल्याने आयसीयुमध्ये भरती करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढला तेव्हा ही बाब समोर आली.

 

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, पेंगवर उपचार सुरू असताना त्याच्या फुफ्फुसांत इंफेक्शन झाले होते. अनेक महिन्यांपासून पेंगला दुर्गंधीयुक्त सॉक्सचा वास घेण्याची सवय लागली होती. त्यामुळे पेंग ऑफिसवरुन घरी आल्यानंतर वारंवार सॉक्सचा वास घेत असे. त्यानंतर त्याला दुर्गंधीयुक्त सॉक्सचा वासाने नशा होत असल्यामुळे त्याने सतत हा प्रकार सुरू ठेवला. त्यामुळेच त्याच्या फुफ्फुसांत इंफेक्शन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

 

रिपोर्ट पाहून डॉक्टरही झाले हैरान
पेंगच्या छातीत असह्य वेदना झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पेंगवर उपचार सुरू असताना पेंगच्या फुफ्फुसांत इंफेक्शन झाल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. सध्या पेंगवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून लवकरच त्याचे इंफेक्शन बरे होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. परंतु पेंगचा रिपोर्ट पाहून त्याच्या किळसवाण्या सवयीमुळे  फुफ्फुसांत इंफेक्शन झाल्याचे डॉक्टरांना कळताच तेही हैरान झाले.

बातम्या आणखी आहेत...