आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचा जन्म दाखला इंग्रजीत हवा होता; पटवाऱ्याने दिले मृत्यू प्रमाणपत्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडोदा- गुजरातच्या बडोद्यात एका पित्याने अडीच वर्षांच्या मुलीचा जन्म दाखला मागितला. त्याने अर्ज दिला तेव्हा त्यांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले. मुलीचे वडील मिथिलभाई पटेल यांनी सांगितले, मुलीला शाळेत प्रवेश घेण्यासाठी जन्म दाखला इंग्रजीत हवा होता.  त्यासाठी एक आठवडा आधी अर्जही दिला.  २० डिसेंबरला प्रमाणपत्र घरी आले. प्रमाणपत्र पाहिले  तेव्हा धक्काच बसला. प्रशासनाने त्यांच्या घरी मृत्यू प्रमाणपत्र पाठवून दिले होते.

 

या बेजबाबदारपणाचा जाब विचारण्यासाठी वरिष्ठांकडे तक्रार केली. परंतु  त्यांनी दोषींवर कारवाई करण्याऐवजी पटवाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. यासंदर्भात राभीपुरा ग्रामपंचायतचे पटवारी नरेश पटेल यांना विचारले असता ते म्हणाले, चुकून मृत्यू प्रमाणपत्र पाठवण्यात आले आहे. मिथिल पटेल यांना एक-दोन दिवसांत नवे जन्म प्रमाणपत्र देण्यात येईल. 

बातम्या आणखी आहेत...