आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्कालीन वाॅर्डात रुग्णांवर जमिनीवर केले जातात उपचार; कुत्र्यांचाही वावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झफ्फरपूर- बिहारमधील मुझफ्फरपूर येथे असलेल्या श्रीकृष्ण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (एसकेएमसीएच)च्या आपत्कालिन वॉर्डात २५ खाटांची क्षमता आहे. परंतु येथे शुक्रवारी ३८ रुग्णांना दाखल करुन घेण्यात आले. अशा परिस्थितीत थंडीच्या काळात उपचार घेताना त्यांना जमिनीवर झोपवण्यात आले. येथे इतका बेजबाबदार कारभार वाढला आहे. या वॉर्डात एका अनाथ महिलेवर या वॉर्डात उपचार सुरू होते. पण तिच्या शेजारी एक कुत्रा येऊन बसलेला दिसला. हे छायाचित्र या रुग्णालयाचा बेजबाबदारपणा दर्शवणारे आहे. या महिलेची जखम जर कुत्र्याने चाटली तर रेबीजचा धोका आहे. रुग्णाचा जीवही जाऊ शकतो.

 

रेबीज व्हायरस सायलेंट किलर
बेवारस कुत्र्यांपासून रेबीजचा धोका असतो. हा सायलेंट किलरप्रमाणे आहे. रेबीज व्हायरस नर्व्हस सिस्टिमवर हल्ला करते. माणसात याची लक्षणे काही दिवसानंतर अथवा महिन्यानंतर दिसून येतात. जिल्हा रुग्णालयात सरासरी दररोज ९० तरी रुग्ण कुत्र्यांनी चावा घेतलेले असतात.

 

बातम्या आणखी आहेत...