आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका- डुप्लीकेट असलेल्या व्यक्तीच्या गुन्ह्यामुळे 17 वर्षे तुरुंगात राहीला निरपराध व्यक्ती; आता मिळेल 8 कोटींचा मिळेल मोबदला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंसास- इथे एका निर्दोष व्यक्तीला आपल्या डुप्लीकेट अपराधीमुळे 17 वर्षांचा तुरुंगवास झाला होता. परंतु आता त्याला न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहे. रिचर्ड अँथनी जोंस असे या व्यक्तीचे नाव असून कोर्टाने त्याला निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. त्याशिवाय त्याला जवळापास 8 कोटींचा मोबदला मिळणार आहे.  

 

निर्दोष जोंसला सर्व फायदे मिळतील-
> कंसासचे अटॉर्नी जनरल डेरेक श्मिट यांनी सांगितले की, आमच्याकडून खऱ्या गुन्हेगाराला पकडण्यात चुकी झाली. परंतु आता आमच्याकडून जितके करता येईल तितक्याप्रकारे आम्ही जोंसला मदत करण्याचा प्रयत्न करु. 

> जोंसने स्वत: निर्दोष घोषित झाल्यानंतर 8 कोटींची नुकसान भरपाईची मागणी केली होती. 

> 1999 मध्ये एका व्यक्तीने रोलँड पार्कमधील एका वॉलमार्टच्या पार्किंममध्ये एका महिलेची पर्स ओढण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी महिलेने त्याच्याशी झटापट केली. तेव्हा त्या तिची पर्स वाचली परंतू चोर तिचा फोन घेऊन पळाला.

> याविरुद्ध महिलेने पोलिसांन तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. तेव्हा एका चुकीच्या जबाबामुळे जोंसला त्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले होते. याप्रकरणी त्याला न्यायालयात दाखल केले असता तेव्हा न्यायानयाने त्याला 19 वर्षांची शिक्षा ठोठोवली होती.

> त्यानंतर जोंसने कंसास युनिव्हर्सिटीतील प्रोजेक्ट ऑफ इनोसेंसमध्ये अप्लाय केले होते. त्यानंतर त्या प्रकरणातील साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाची परत चौकशी करण्यात आली. त्यात जोंसविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने न्यायाधिशांनी त्याला जून 2017 मध्ये निर्दोष मुक्त केले होते.

> जोंसची निर्दोष सुटका झाल्यानंतर कोर्टाने त्याला पूर्णपणे निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. 

बातम्या आणखी आहेत...