आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shocking News: Pain In Neck And Head Turned To Be A Life Threatening Disease For A Woman

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सतत डोकेदुखी व मानदुखीने त्रस्त होती महिला, तिला वाटायचे चुकीच्या पद्धतीने झोपल्याने होत असेल, पण टेस्ट केल्यावर समोर आले हे सत्य...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेट मॅनचेस्टर- ब्रिटेनमध्ये राहणारी एक महिला तिला असलेल्या मानदुखी, डोकेदुखीचे कारण चुकीच्या पद्धतीने झोपण्याची सवयी समजत राहीली. परंतू अचानक तिला असह्य वेदना सुरू झाल्याने ती डॉक्टरांकडे गेली. तिथे तिला समजले की तिच्या आयुष्याची काही आठवडेच बाकी आहे. डॉक्टरांनी तिला सांगितले की, तातडीने ऑपरेशन नाही केल्यास तिला आपला जीव गमवावा लागू शकतो. समंथा स्मिथ (वय32) असे या महिलेचे नाव असून तिला एक दुर्मिळ आजार झालेला होता. 

 

समंथाला आहे दुर्मिळ आजार
डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, समंथा 'Ehlers Danlos Syndrome'या आजाराने त्रस्त आहे. या आजारामुळे शरीरातील कनेक्टिव्ह टिशू कमजोर होतात. त्यामुळेच समंथाच्या मानेचे हाड ठिसूळ झाले होते. तिच्यावर लवकर उपचार झाले नसते तर तिला आपला जीव गमवावा लागला असता.

 

डॉक्टरांनी सांगितले, जीव वाचवायचा असेल तर खर्च करावे लागतील कोट्यावधी रुपये
'Ehlers Danlos Syndrome' हा आजार गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी कोट्यावधींचा खर्च येतो. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, समंथाची सर्जरी करण्यासाठी तिला जवळपास 2 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यानंतर समंथाने ऑनलाइन चॅरिटीच्या माध्यमातून पैसे जमा करणे सुरू केले आहे.

 

समंथा म्हणाली, प्लिज मला मदत करा, अन्यथा मी जिवंत नाही राहू शकणार
समंथाने सांगितले की, 25 तारखेला तिची सर्जरी होणार आहे. या तारखेच्या आत तिला कोणत्याही परीस्थितीत दोन कोटी जमवायचे आहे. त्यासाठी तिने लोकांकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करत विनंती केली की, ' प्लिज मला मदत करा, अन्यथा मी दोन कोटी जमा करु शकले नाही तर मी जीवंत राहू शकणार नाही.'