Home | Khabrein Jara Hat Ke | Shocking news: Teen Woman charged with child abuse after putting her baby in unused freezer

8 महिन्याच्या चिमुरड्याला घेऊन घराच्या मागे गेली 19 वर्षाची आई; काहीतरी विचित्र प्रकार होत असल्याचा संशय येताच शेजारच्यांनी कळवले पोलिसांना

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 11, 2019, 12:17 AM IST

महिलेने चिमुरड्यासोबत केले असे काही की शेजारचेही झाले हैरान.

  • Shocking news: Teen Woman charged with child abuse after putting her baby in unused freezer

    टेनेसी- अमेरिकेत एका अल्पवयीन महिलेला आपल्या विचित्र कृत्यामुळे तुरुंगाची हवा खावी लागल्याची घटना समोर आली आहे. स्मिथ (वय19) असे या अल्पवयीन महिलेचे नाव असून तिने आपल्या 8 महिन्याच्या बाळाला घरामागील बंद फ्रिजरमध्ये डांबले. नेमके तिला हे करताना तिच्या शेजारच्यांनी पाहिले. त्यांना काहितरी विचित्र प्रकार होत असल्याचा संशय येताच त्यांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बाळाचा जीव वाचवत आरोपी स्मिथला अटक केली.

    > पोलिसांनी सांगितल्यानुसार, त्यांनी आरोपी स्मिथवर बाळाशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करुन तिला अटक केली आहे. आरोपी स्मिथने कबुली दिल्यानुसार, तिने 8 महिन्याच्या बाळाला घरामागील फ्रिजरमध्ये बंद केले होते. परंतू हे कृत्य करत असताना तिच्या शेजारच्यांनी तिला पाहिले. ती घरात जाताच कुठलाही विलंब न करता त्यांनी बाळाला फ्रिजमधून बाहेर काढले. त्यांनतर त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांनी हा सर्व प्रकार पोलिसांना कळवताच पोलिस तिथे दाखल होऊन आरोपी स्मिथला अटक केली. सध्या बाळाची प्रकृती व्यवस्थित असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्येच ठेवण्यात आले आहे.

  • Shocking news: Teen Woman charged with child abuse after putting her baby in unused freezer
  • Shocking news: Teen Woman charged with child abuse after putting her baby in unused freezer

Trending