Home | National | Other State | Shocking news: Truck Crushed Motorcycle; Four people die on the spot

दुर्दैव ! दवाखान्यातून घरी जाताना ट्रकने चिरडले; चार जणांचा जागीच मृत्यू

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 03:36 PM IST

नॅशनल हायवे क्रमांक 73 वर सात वर्षांच्या मुलीसह दोन महिला आणि मोटरसायकल स्वार यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

 • Shocking news: Truck Crushed Motorcycle; Four people die on the spot

  मशरक- बिहारमधील सराय ओपी ठाण्यातील परिसरात नॅशनल हायवे 73 वर वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला चिरडून पळून गेल्याची घटना घडली आहे. प्रत्यदर्शींनी सांगितल्यानुसार, ट्रकने चिरडल्यानंतर मोटरसायकल स्वार, दोन महिला, 7 वर्षांच्या मुलीसह चार लोकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर लगेच पोलिस घटनास्थळी हजर होऊन त्यांनी मृत देहांना रुग्णालयात शवविच्छादनासाठी पाठवले. मोटरसायकलला चिरडल्यानंतर घटनास्थळावरून पसार झालेल्या ट्रक ड्रायव्हरविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

  मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत
  या अपघातानंतर एसडीओ अमर समीर यांनी मृतांच्या कुटुंबियांना 4 लाखांची मदत जाहीर केली आहे. मृतांमधील एका 3 वर्षीय बालकाच्या हाताला पट्टी लावलेली होती. त्यानुसार हे कुटुंब दवाखान्यातुन येत असल्याची माहिती त्यांनी दिली.

  अज्ञात ट्रक ड्रायव्हरविरोधात गंभीर गुन्हा नोंदवून त्याला पकडण्याचा प्रयत्न
  मृतांच्या कुटुंबियांनी ट्रक ड्रायव्हरविरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी ड्रायव्हरविरोधात कठोर कारवाई करणार असून त्याला पकडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकारी नवीन चंद्र यांनी दिली.

Trending