आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking News, Woman Orders Food In A Cafe But After That She Can't Believe Her Eyes When She Sees Her Receipt

कॅफेत महिलेने दिली होती खाण्याची ऑर्डर; त्यानंतर अचानक रिसीप्ट पाहून तिथेच झाली स्तब्ध, डोळ्यांवर बसेना विश्वास...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेला कॅफेत नाष्टा घेण्यासाठी गेली तेव्हा तिला एक विचित्र अनुभव आला. नाष्ट्याचे बिल तिने हातात घेतले तेव्हा त्यातील शब्द वाचून ती खुपच हैरान झाली. त्या बिलात महिलेच्या नावाऐवजी असे काही लिहले होते की ते वाचल्यानंतर महिला अचानक शांत झाली. त्या बिलात तिचा चेहरा पाहून तिची ओळख लिहली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती महिला ज्याला बिल समजत होती ते बिल नसून हॉटेलमध्ये ऑर्डर देण्यासाठीची ती एक पावती होती. कॅथरीन चेन असे या महिलेचे नाव असून या घटनेनंतर ती चांगलीच हॉटेलकर्मचाऱ्यांवर चांगलीच संतापली होती.

 

पावती पाहून आश्चर्यचकीत झाली कॅथरीन 

> कॅथरीनने एका हॉटेलमध्ये रॅसिन टोस्ट नावाची एक डीश ऑर्डर केली होती. 
> टोस्ट मिळाल्यानंतर रॅसिनला बिल देण्यात आले. परंतु रॅसिन बिलाकडे पाहून थोडी गोंधळली. काउंटरशेजारी असलेल्या एका व्यक्तीने तिला एक पावती दिली.            
> पावती मिळाल्यानंतर कॅथरीनने पावतीवरील शब्द वाचल्यानंतर ती अचानक संतापली. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्या पावतीवर मोठ्या अक्षरात 'ASIAN' असे नाव लिहले होते. हॉटेल कर्मचाऱ्यांनी हे नाव कॅथरीनचा चेहऱ्यावरील हावभाव पाहून लिहले होते.
> हॉटेल कर्मचाऱ्यांनी पावतीवर कॅथरीनचे नाव लिहण्याऐवजी ती ज्या ठिकाणाशी संबंध ठेवते त्या ठिकाणाचे नाव लिहले होते. पावतीवरील नाव वाचल्यानंतर कॅथरीन तिथेच स्तब्ध उभी राहिली.

 

लोकांना हॉटेल लक्षात रहावे यासाठी अशा पद्धतींचा अवलंब

> कॅथरीनने सांगितल्यानुसार, हॉटेल व्यवसायात अनेकदा लोकांना हॉटेल लक्षात रहावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. त्यामुळे या हॉटेलमध्येही हॉटेल कर्मचाऱ्यांनी असे केले. या हॉटेलमध्ये कॅथरीनला पावती देताना ती चीनी असल्यामुळे तिला 'ASIAN' या शब्दाची पावती देण्यात आली.
> हा अनुभव सांगत असताना कॅथरीन सांगते की, 'मी हॉटेलमध्ये गेली असताना तिथे एकही ग्राहक नव्हता. मी ऑर्डर केल्यानंतर बराचवेळ मी तिथे उभी राहीले. तेव्हा मला ओळखण्यासाठी त्यांना काहीच अवघड गेले नाही. 
> जो कर्मचारी कॅथरीनला ऑर्डर देत होता तेव्हा दोघांमध्ये संवादही झाला. त्यावेळी तो कॅथरीनचे नावही विचारत होता. परंतु त्याने तसे न करता तिला पावती देऊन गोंधळात पाडले.

 

बातम्या आणखी आहेत...