आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घरातून येत होता चिमुरड्याचा रडण्याचा आवाज; तो सारखा ओरडत होता, 'तु मरत का नाहीस?' अनर्थ होत असल्याच्या संशयाने पादचाऱ्याने कळवले पोलिसांना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ- ऑस्ट्रेलियामध्ये एका घरातून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता. एक व्यक्ती वारंवार म्हणत होता, 'तु मरत का नाहीस, तु मरत का नाहीस.' तेव्हाच एक चिमुरडाही मोठ्याने रडत होता. हा सर्व प्रकार पाहून तिथून जाणाऱ्या पादचाऱ्याने पोलिसांना याची माहिती कळवली. त्यानंतर तातडीने पोलिस तिथे दाखल होवून तपास करु लागले. घरात गेल्यानंतर त्यांनी जे पाहिले तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. सध्या या घटनेची सगळीकडे चर्चा होत असून पोलिसांना कळवणाऱ्या पादचाऱ्याला नाहक पोलिसांची माफी मागावी लागली.

 

आवाज ऐकून घाबरला पादचारक, कळवले पोलिसांना
ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरात नविनवर्षाच्या सुरवातीला बापलेकांसोबत विचित्र प्रकार घडला. त्यामागचे कारण म्हणजे या दोघांनाही कोळ्यापासून प्रचंड भिती वाटत होती. नेमके नविनवर्षाचा उत्सव साजरा करत असताना त्यांच्या घरात एक मोठा कोळी आला. त्याला पाहून दोघेही प्रचंड घाबरले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले. जवळपास तास दोन तास हा प्रकार तसाच सुरू राहिला. त्यामुळे त्यांच्या घराबाहेरच्यांना काहितरी अनर्थ प्रकार होत असल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांच्यातील एकाने पोलिसांना याची माहिती कळवली. थोड्याच वेळात पोलिस तिथे हजर झाल्यानंतर ते घरात पोहचले. घरात घुसल्यानंतर त्यांनी जेव्हा समोरील दृश्य पाहिल्यानंतर तेही हैरान झाले. 

 

पोलिसही झाले हैरान
पोलिस घटनास्थळी पोहलच्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तो व्यक्ती कोळ्याला मारण्याचा प्रयत्न करत होता आणि चिमुरडा मोठ्याने रडत होता. त्यानंतर पोलिसांनी कोळ्याला पकडून घराबाहेर फेकल्याने या बापलेकांनी सुटकेचा श्वास सोडला. या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकांउंटवरुन या घटनेची माहिती शेअर केली होती.