आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडोनकास्टर- 21 वर्षाच्या महिलेने तोंडातील व्रणाकडे दुर्लक्ष केले, ज्यामुळे आता तिचा जीव धोक्यात गेला आहे. इंग्लंडच्या साउथ यॉर्कमध्ये राहणाऱ्या मिलीला या वर्षी जानेवारीत तोंडात व्रण आले होते. व्रण मोठा होता पण तिला वाटले की, हा सामान्य आहे आणि ठिक हाऊन जाईल. पण एप्रीलपर्यंत तिच्या तोंडातुन भयानक वास येउ लागला.
- जेव्हा तोंडाची समस्या घेउन मिली डेंटिस्ट कडे गेली, तेव्हा तिला कँसर झाल्याचे समजले. तिचा कँसर जीभेपासून आत गळ्यापर्यंत पसरला होता.
बंद झाले जेवण
- जीभेवर आणि आत गळ्यापर्यंत कँसर पसरलेला होता त्यामुळे तिचे जेवण बंद करावे लागले. तिने सांगितले,'' या आजारा बद्द्ल कळाले तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. काही दिवसांतच माझे 25 किलो वजन कमी झाले. मला आता पश्चाताप होत आहे, मी आधीच त्या व्रणाचा इलाज करून घेतला असता तर इतका मोठा आजार झालाच नसता.''
पाइपच्या मदतीने घ्यावा लागतोय श्वास
- ऑपरेशनच्या वेळेस कळाले की, मिलीच्या जीभेचा आणि तोंडाचा 70 टक्के भागात कँसर पसरलेला आहे. त्यामुळे तिला श्वास घेण्यासाठी पाइपची मदत घ्यावी लागत आहे.
आता फक्त ट्रीटमेंटचा आधार
- ऑपरेशननंतर मिलीला कीमोथेरेपी सोबतच रेडियोथेरेपी दिली जाईल. ज्यामुळे कँसरला पसरण्यापासून थांबलता येईल.
ही आहेत माउथ कँसरची लक्षणे
- अनेक दिवस तोंडात व्रण येणे.
- तोंडात लाल आणि पांढरे डाग येणे
- अनेक दिवस मानेत सुज येणे.
- जीभ सुन्न पडणे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.