आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking Reason Behind Girls Phone Number On Wall Of Public Toilets Reveled In Research

तरुणींची नावे-मोबाइल नंबर शौचालयांमध्ये का लिहिली जातात? रिपोर्टमध्ये झाला खळबळजनक खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे स्टेशनच्या भिंती, सार्वजनिक शौचालये, मेट्रो आणि जेथे संधी मिळेल तेथे महिला-मुलींची नावे, सोबतच त्यांचे मोबाइल नंबर लिहून अभद्र मजकूर लिहिलेला नेहमीच दिसतो. अभद्र मजकुराचा अर्थ- या वेश्या आहेत आणि त्यांच्याकडून तुम्हाला चरमसुखाची अनुभूती मिळेल असाच आहे.

 

एवढी विकृत मानसिकता माणसांमध्ये कुठून येते? एवढे निर्लज्ज लिखाण करून आपल्या आई-बहिणींसमोर जाण्यासाठी कसे धजावत असतील हे विकृत? विचार करण्यासारखीच ही गोष्ट आहे. याच प्रश्नांचे उत्तर देताना दिल्लीतील एका खासगी रुग्णालयाच्या मनोचिकित्सक तराना सैनी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ही एकप्रकारची बिघडलेली मनोदशा आहे आणि अशाच व्यक्तींमध्ये निर्माण होते जे स्त्रियांना फक्त वासना शमवण्याची वस्तू म्हणून पाहतात. 

 

एक शॉकिंग आपबीती
अनेक बाबतींत अशा व्यक्ती दुहेरी जीवन जगत असतात. समाजासमोर ते सज्जनांसारखे वावरतात, परंतु वास्तवात अंतर्मनातून कुंठित मानसिकतेने ग्रस्त असतात.

एका प्रतिष्ठित कंपनीत काम करणारी निशा (काल्पनिक नाव) हिने आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, "मागच्या काही महिन्यांपासून मला ब्लँक कॉल येत होते. कॉल करणारा फक्त माझे नाव विचारायचा आणि फोन कट करायचा. हे अनेक महिने सुरूच राहिले. एका दिवशी अज्ञात नंबरवरून मला एक व्हॉट्सअॅप मेसेज आला, त्यात तुझा रेट काय? तू एका तासाचे किती चार्ज करतेस? असे विचारण्यात आले होते. हे वाचताच मी नखशिखान्त हादरून गेले. विचारल्यावर ती व्यक्ती म्हणाली की, त्याला एका मेट्रो स्टेशनच्या पुरुषांच्या मुतारीच्या भिंतीवर माझे नाव आणि नंबर आढळला."

 

आता यात विचित्र योगायोगाची गोष्ट म्हणजे निशा ज्या कार्यालयात काम करते तेथीलच सुमेधालाही असाच अनुभव आला. दोघींनाही सारखेच वाईट अनुभव आले. निशा म्हणाली- त्या व्यक्तीला मी जेव्हा पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली, तेव्हा तो भिऊन माफी मागू लागला. आणि त्याने मला बाथरूमच्या भिंतीवर लिहिलेली तरुणींची नावे आणि नंबर्सचा स्क्रीनशॉट पाठवला. त्यावर माझ्या ऑफीसमधील सहकारी सुमेधा आणि आणखी एका मैत्रिणीचे नाव-नंबर होते.

 

सुमेधा म्हणाली की, ज्या मेट्रो स्टेशनच्या बाथरूममध्ये हे सर्व लिहिण्यात आले आहे, ते आमच्या ऑफिसजवळच आहे.  दिशा म्हणाली की, आम्ही दोघी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर त्या मेट्रो स्टेशनवर गेलो आणि तेथे तैनात सीआयएसएफ कर्मचाऱ्याला ही माहिती दिली. मग तेथे तैनात सुरक्षा अधिकारी पुरुषांच्या बाथरूममध्ये गेले आणि तेथे पाहणी करून सांगितले की, तेथे डझनभर मुलींची नावे लिहिलेली होती. जे आम्ही काळ्या पेंटने मिटवले."

 

काय आहे कारण....

मनोवैज्ञानिक डॉ. तराना यांनी सांगितले की, एक प्रतिष्ठित, सभ्य, सुसंस्कृत माणूसही असे कृत्य करू शकतो. पोलिस त्यांचे काम करतातच, परंतु एका सर्वसाधारण दृष्टिकोनातून सांगायचे झाल्यास एकाच ऑफिसमधील काही मुलींचे नंबर सार्वजनिक स्थळांवर लिहिले जाणे म्हणजे यात नक्कीच त्यांच्याच एखाद्या सहकाऱ्याचा हात असतो. जवळची माणसेच धोका देतात, असे म्हणायलाही हरकत नाही. एखाद्या मुलीचे-महिलेचे नाव-नंबर एखाद्या भिंतीवर लिहिल्याने ती वेश्या मुळीच ठरत नसते. उलट लिहिणाऱ्याची नपुंसकता यातून जगजाहीर होत असते. 
असे कृत्य करणारा मनातल्या मनात त्या स्त्रीविषयी अश्लील विचार करत असतो. परंतु जे प्रत्यक्षात घडू शकत नाही, ते असे प्रकार करून मनाला एक विकृत समाधान देत असतो. परंतु असे कृत्य वारंवार घडत असल्यास त्या व्यक्तीला निश्चित गंभीर मनोरोग होण्याची दाट शक्यता निर्माण होते. 

 

बातम्या आणखी आहेत...