आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोसरी आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; दोन्ही मुलींवर झाले होते लैंगिक अत्याचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : भोसरी आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मृत दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. बापानेच आपल्या मुलींवर बलात्कार केल्याचे समजल्यावर आईने  तिन्ही मुलांना फाशी देऊन स्वतः आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. 


रविवार (दि.28 जुलै) रोजी संध्याकाळी पुण्यातील भोसरी येथील दिघी रोडवरील नूर मोहल्ल्यात एका आईने आपल्या पोटच्या तीन मुलांची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. मुलांच्या हत्येनंतर आईनेही आत्महत्या केली होती. अलफिया बागवान, झोया बागवान, जिआन बागवान अशी मृत मुलांची नावे असून फातिमा अक्रम बागवान असे मातेचे नाव आहे.