आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्टटाइम प्रेयसीच्या नावावर सेक्स वर्कर बनल्या शाळा-कॉलेजच्या मुली, बॅन करावा लागला हॅशटॅग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग - चीनमध्ये गतवर्षी पार्टटाइम गर्लफ्रेंड्सचे विचित्र चलन सुरू झाले होते. तरुणांना गर्लफ्रेंडसारखा आधार देण्याच्या नावावर या विचित्र ट्रेंडची सुरुवात झाली होती. रिपोर्ट्सनुसार, गतवर्षी एका चिनी तरुणीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून पार्टटाइम गर्लफ्रेंड बनण्याचे काम सुरू केले होते, यानंतर तिला अनेकांनी फॉलो केले. कमी वयाच्या मुलीही पैसा कमावण्याच्या लालचीने या चुकीच्या कामात गुंतल्या. यातील एका मुलीने आपली कहाणी सांगत म्हटले की, सभी पार्टटाइम गर्लफ्रेंड सेक्स ऑफर करत नाहीत, त्या फक्त एका गर्लफ्रेंडसारखी अॅक्टिंग करतात, यासाठी त्यांनी मोठी रक्कम मिळते. परंतु नंतर त्यांचे आयुष्य बरबाद झाले. 

 

खतरनाक ठरला हा ट्रेंड...
- पाहता-पाहता हा एक ट्रेंड बनला. या गोरखधंद्यात येथील शाळा-कॉलेजात जाणाऱ्या कमी वयाच्या मुलीही पार्टटाइम गर्लफ्रेंड बनू लागल्या आहेत. सुरुवातीला काही मुली मजा म्हणून आणि काही पैशांसाठी यात सामील झाल्या. परंतु पाहता-पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली. काही मुली म्हणाल्या की, त्यांना सोबत हिंडणे-फिरणे, मूव्ही पाहणे चांगले वाटत होते, यासाठी पैसे मिळायचे. परंतु मग गोष्ट पेड सेक्सपर्यंत येऊ लागली. 

 

हिंडण्यासाठी आणि डिनरवर जाण्यासाठीही पैसे
- एका पार्टटाइम गर्लफ्रेंड राहिलेल्या मुलीने सांगितले की, तिला सोबत हिंडण्यासाठी किंवा डिनरवर जाण्यासाठी जवळजवळ अडीच ते 3 हजार रुपये मिळायचे. दुसरीकडे, पूर्ण दिवस वेळ घालवल्यास तब्बल 10 हजार रुपये मिळायचे. परंतु काही महिन्यांनंतर तिने हे काम सोडले, कारण ती एका नव्या रिलेशनशिपमध्ये आली होती. 19 वर्षे वयाची ही विद्यार्थिनी आता पश्चात्ताप करते की, तिने असे काम का केले? 

 

बॅन करावा लागला हॅशटॅग
- पार्टटाइम गर्लफ्रेंड्सचा बिझनेस एवढा वाढला होता की, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साइटवर त्यांचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. #ptgf च्या माध्यमातून इंस्टाग्राम आणि अनेक नेटवर्कवर सेक्स ग्राहकांचा शोघ घेतला जायचा. मग डायरेक्ट मेसेज करून मीटिंग फिक्स केले जाते. तथापि, रिपोर्ट्समध्ये समोर आले आहे की, इंस्टाग्रामने #ptgf आणि #hkptgf बॅन केले आहे. ते सर्च केले जाऊ शकत नाहीत. परंतु ओरिजिनल टॅगमध्ये काही बदल करून अजूनही ते सर्च केले जात आहेत. 

 

पार्टटाइम गर्लफ्रेंड बनण्याचे कारण?
काही समाजसेवींनी या विषयावर अभ्यास केल्यावर कळले की, मुली एकटेपणा, कौटुंबिक प्रॉब्लेम आणि पैशांसाठी पार्टटाइम गर्लफ्रेंड बनत होत्या. एक हायस्कूलची विदयार्थिनी म्हणाली की, तिने 17 वर्षे वयापासून पार्टटाइम सेक्स वर्क सुरू केले. #ptgf वरून अशीच डिमांड करणाऱ्या लोकांना इंस्टाग्रामवर शोधणे सोपे होते.

 

एकटेपणामुळे घेतला निर्णय
या विद्यार्थिनीने सेक्स वर्क सुरू करण्याचे कारण सांगितले की, तिचे आपल्या बहिणीशी भांडण झाल्यामुळे ती नाखुश होती. यामुळे ती अशा व्यक्तीच्या शोधात होती, जो तिचे म्हणणे ऐकून घेईल. पहिल्यांदा तिला हे सर्व चांगले वाटले. यासाठी लोकांचा शोध घेऊ लागली. या स्टूडेंटने मान्य केले की, अनोळखी लोकांशी भेटण्यात तिला संकोच वाटायचा, परंतु या कामासाठी तिला पैसे मिळायचे. तिच्या कुटुंबाकडे जास्त पैसा नव्हता. यामुळे ती या माध्यमातून स्वत:साठी पैसा कमावू लागली होती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...

 

बातम्या आणखी आहेत...