Home | National | Other State | Shocking Shootout: When a 2-year-old girl started crying

2 वर्षाच्या मुलीला कडेवर घेऊन गच्चीवर फिरत होती आई, अचानक मुलीच्या डोक्यातुन येऊ लागले रक्त; समोर आले धक्कादायक कारण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 11, 2018, 12:39 PM IST

लुधियानाच्या किदवाई भागातील घटना

  • लुधियाना (पंजाब) - येथील किदवाई नगर भागात 2 वर्षीय चिमुकलीच्या डोक्यात बुलेट किंवा एखादी टणक वस्तु लागल्याने तिच्या डोक्यातुन रक्त आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुलीची आई तिला कडेवर घेऊन गच्चीवर फिरत होती. अचानक एका धमाक्याच्या आवाजानंतर मुलीच्या डोक्यातुन रक्तस्त्राव होताना पाहून मुलीची आई घाबरली. मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला कोणत्यातरी टणक वस्तुचा मार लागल्याचे उपचारादरम्यान समोर आले.

    शहरातील शिवलिंग मंदिराचे पुजारी दीपक शर्मा यांची मुलगी फाल्गुनी शर्मा हिला मॉडेल टाउन दीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बुलेट किंवा टणक वस्तू मुलीच्या डोक्याला स्पर्श करून गेल्यामुळे तिचे प्राण बचावले. असे म्हणले जाते की कोणीतरी हवेत गोळीबार केल्यामुळे हा प्रकार घडला. पोलिस त्या व्यक्तीचा शोध घेत आहे. मुलीच्या डोक्यात बुलेट लागली किंवा इतर काही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिस उपनिरीक्षक प्रीतमपाल सिंग संबंधीत घटनेचा पुढील तपास करत आहे.

  • Shocking Shootout: When a 2-year-old girl started crying
  • Shocking Shootout: When a 2-year-old girl started crying

Trending