आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Story: 34 वर्षे वयाच्या शिक्षिकेने 12 वर्षीय विद्यार्थ्यावर केला रेप, 7 वर्षांची शिक्षा भोगून परत त्याच्याशीच केले लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - ही कहाणी अमेरिकेची 34 वर्षीय एक शिक्षिका आणि तिच्या किशोरवयीन विद्यार्थ्याची आहे. त्यांचा प्रेमापासून ते लग्नापर्यंतचा प्रवास खूप अडचणींचा होता. शिक्षिका मेरीने जेव्हा पहिल्यांदा विलीशी संबंध बनवले तेव्हा त्याचे वय फक्त 12 वर्षे होते. यानंतर मेरी प्रेग्नंट झाली आणि तिला अल्पवयीनावर बलात्कारप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. तिला तुरुंगात जावे लागले होते. दुसरीकडे त्यांच्या जन्मलेल्या मुलांची जबाबदारी अल्पवयीन विद्यार्थ्यावर आली. त्याने त्या दिवसांचे अनुभव शेअर करत सांगितले की, ते दिवस आयुष्यातील सर्वात काळे दिवस होते.

 

रेपच्या आरोपात झाली होती 7 वर्षांची कैद
- ही गोष्ट सन 1996 ची आहे. तेव्हा विली सिएटलमध्ये 6व्या इयत्तेत शिकत होता आणि मेरी शाळेत त्याची शिक्षिका होती. त्या वेळी विली फक्त 12 वर्षांचा होता आणि मेरीचे वय 34 वर्षे होते.
- यादरम्यान दोघांत प्रेमाला सुरुवात झाली आणि दोघांत शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. हे सर्व वर्षभर सुरू राहिले. 1997 मध्ये मेरीला तेव्हा अटक करण्यात आली, जेव्हा ती विलीच्या मुलाची आई बनणार होती.
- कोर्टात केसच्या सुनावणीदरम्यान मेरीने हे कबूल केले की, तिने विलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मेरीने तुरुंगातच बाळाला जन्म दिला आणि यामुळे तिला 6 महिन्यांच्या शिक्षेनंतर पॅरोलवर सोडण्यात आले.
- तथापि, कोर्टाने मेरीला ही ताकीद दिली होती की, ती विलीसोबत कधीच दिसून येऊ नये. यासाठी तीही तयार झाली. परंतु तुरुंगातून सुटताच मेरी आणि विली पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले.
- सुटकेच्या काही महिन्यांनी पुन्हा दोघांना कारमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. मेरी या वेळी पुन्हा प्रेग्नंट होती, परंतु तिला पॅरोलच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 7 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
- 2004 मध्ये सुटकेनंतर काही तासांतच मेरी आणि विली पुन्हा एक झाले. त्यांच्यात अनेक वर्षांपासून कोणताही संपर्क नव्हता तरीही. पुढच्याच वर्षी दोघांनी लग्न केले.
- तेव्हा विलीचे वय 20 वर्षे झाले होते आणि मेरीचे वय 42 वर्षे होते. आता दोघेही दोन मुलांचे आईवडील बनलेले होते. लग्नानंतर मेरीने आणखी दोन मुलांना जन्म दिला आणि कुटुंबासोबत वॉशिंग्टनमध्ये राहते. 

 

डिप्रेशनमध्ये गेला होता विली
- विलीने कमी वयात बाप बनण्याचा आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, ते आयुष्यातील सर्वात काळे दिवस होते. मुले झाल्यानंतर आयुष्यात खूप मोठा बदल झाला होता आणि कुटुंबाचाही कोणताही सपोर्ट नव्हता.
- विलीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते की, मेरी जेलमध्ये होती आणि मी हायस्कूल ड्रॉपआऊट होतो म्हणून दोन्ही मुलांची कस्टडी मेरीच्या आईजवळ होती. मी बाप तर बनलो होतो, परंतु जबाबदारी उचलण्यालायक नव्हतो.
- तो म्हणाला की, माझे मित्रही माझी मदत करू शकत नव्हते, कारण त्यांना पॅरेंटिंगची आयडिया नव्हती. तेही 14 ते 15 वर्षांचेच होते. यामुळे मी अल्कोहोलिक झालो आणि डिप्रेशनमध्ये गेलो होतो.
- विलीने सांगितले की, माझे आयुष्य खूप निराशाजनक झाले होते, कारण कोणीच मला समजून घेत नव्हते आणि मीही कुणाला सांगू शकत नव्हतो. माझे वडील या जगात नव्हते आणि आई खूप बिझी राहायची, म्हणून मी खूप एकटा राहायचो.

 

दांपत्य मुलींना देत आहे वॉर्निंग
मेरी आणि विलीने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, त्यांच्या मुलांनाही कधीच अशा रिलेशनशिप आणि डेटिंगच्या फंदात पडू द्यायची इच्छा नाही. विलीने सांगितले की, मी एखाद्या कमी वयाच्या मुलाला कधीही एखाद्या मोठ्या व्यक्तीशी लग्न किंवा रिलेशनशिपला पाठिंबा देणार नाही. त्याने आपल्या मुलींना हायस्कूलमध्ये डेटिंग न करण्याची वॉर्निंग दिली. विलीचे म्हणणे आहे की, हे सर्व मी माझ्या स्वत:च्या अनुभवांवरून सांगत आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या अनोख्या कपलचे आणखी Photos.. व Video   

 

 

 

बातम्या आणखी आहेत...