आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर लाइफ सपोर्ट सिस्टिम केली बंद, रुग्ण दुसऱ्याच दिवशी शुद्धीवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अमेरिकेतील नेब्रास्का येथे राहणाऱ्या स्कॉट मॉर यांना एक महिन्यापूर्वी स्ट्रोक आला होता. यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. अनेक दिवस त्यांच्या मेंदूकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने डाॅक्टरांनी त्यांचा ब्रेन डेड घोषित केला. त्यानंतर त्यांची लाइफ सपोर्ट सिस्टिम बंद केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्कॉट शुद्धीवर आले. डॉक्टरांनी स्कॉट शुद्धीवर येणार नसल्याचे घोषित केल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी आशा सोडली होती. स्कॉटची मुलगी प्रेस्टन म्हणाली, माझे वडील आता कधीच शुद्धीवर येणार नाहीत, असे वाटले होते. माझ्या मुलांनी मला कधीच दवाखान्याच्या बेडवर पाहू नये, असे ते नेहमी म्हणत असत. यामुळे आम्ही अंत्यसंस्कारांची तयारी सुरू केली होती. लाइफ सपोर्ट सिस्टिम बंद केल्यानंतर स्कॉट यांचा श्वासोच्छ्वास सुरू हाेता. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या वडिलांना श्वासोच्छवास घेताना पाहिले आणि त्यांना अंगठा हलवण्यास सांगितले. 

 

उच्च रक्तदाबामुळे आला होता स्ट्रोक 
स्कॉटवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले, लाइफ सपोर्ट सिस्टिम बंद केल्यानंतर स्कॉट यांनी प्रतिसाद दिला. तेव्हा त्यांच्या काही चाचण्या केल्या. यात त्यांना उच्च रक्तदाबामुळे स्ट्रोक आल्याचे निष्पन्न झाले. याचा अर्थ त्यांचा आजार बरा होऊ शकतो, असा होतो. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...