आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभर घाम गाळून पिकवंल, हाताला फोडं आणून कमावलं, अन् क्षणात सर्वस्व राख झालं!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- घरात चार माणसं, विहीरींचे खोदकाम करून हाताला फाेडं आणून पै पै जमा केली, यातूनच जमा झालेल्या पैशातून स्वत:च्या मालकीचेे शेत नसल्यामुळे दुसऱ्याची जमिन बटईने कचली. त्यामधून कापूस आला. काही विकला काही विकायचा होता. आता उरलेलाही विकायचा आणि घर बांधायचे असा त्यांचा विचार. आणखी काही पैसे येतील, या आशेने घरातील चारही व्यक्ती राब राब राबतच होते. नेहमीप्रमाणे घरातील सर्व सदस्य कामावर गेले असता अचानकपणे घराला आग लागली, विचार केलेले सर्व स्वप्नवतच राहीले. कारण या आगीत घरातील कापूस, साठ हजारांची राेख, वर्षभराचे धान्य इतकेच काय तर संध्याकाळी जेवणासाठी घरात काहीच राहीलं नाही, सर्व जळून राख झाले, त्यांच्याजवळ स्वमालकीचे उरले फक्त अंगावरचे कपडे. ही करुन कहानी आहे चांदूर बाजार तालुक्यातील थुगाव पिंप्री येथील विहीर खोदकाम करणाऱ्या सुभाष बोरवार यांची. 

 

सुभाष बोरवार यांचे थुगाव येथे लहानसे दोन खोल्यांचे घर. सुभाष बोरवार हे परिसरातील गावात, शेतात विहीरी खोदण्याचे काम करतात. त्यांच्या या कामात अलीकडे त्यांचा मोठा मुलगा अंकीत (वय १७) हा शाळा शिकून हातभार लावतो. तसेच लहान मुलगा शाळेत जातो आणि शेतात काम करतो, पत्नीसुद्धा शेतीचे काम करते. कुटूंबातील चारही सदस्य प्रचंड मेहनत करून पै पै गोळा करत होते. दरम्यान, यंदा त्यांनी पाच एकर शेत बटाईने केले. या शेतामधून आतापर्यंत २६ क्विंटल कापूस आला होता. त्यापैकी अकरा क्विंटल कापूस विकून साठ हजार रुपये आले होते तर उर्वरित पंधरा क्विंटल कापूस विकायचा होता. विकलेल्या कापसाचे साठ हजार, उर्वरित कापूस विकून येणारी रक्कम यामधून यंदा घर बांधयाचा बोरवार कुटूंबियांचा विचार होता. मात्र शनिवारी (दि. २२) सकाळी सर्व सदस्य कामासाठी घरातून बाहेर पडले आणि घरात अचानकपणेे आग लागली. शेजाऱ्यांना आग लागल्याचे लक्षात येईपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग विझल्यानंतर लगबग करत बोरवार कुटूंबिय घरी पोहोचले मात्र त्यावेळी घरात पाहिले असता, घरात सर्व काळोख पसरला होता, पांढरा शुभ्र कापूस काळा होवून त्यामधून धूर येत होता, गहू जळून गेला होता इतकेच काय तर संध्याकाळी स्वयपांक करायला एक भांडही चांगल नव्हते, थंडीच्या दिवसात अंथरायला आणि पांघरायचेही सर्व सर्व जळून राख झाले होते. घरातील नाटाही पेटून खाली पडण्याच्या स्थितीत आल्या. कापूस व इतर साहित्यांसोबत बोरवार कुटूंबियांनी घर बांधण्याचे पाहिलेले स्वप्नही आगीसोबत राख झाले होते. बोरवार कुटूंबासमोर आकस्मिकपणे आलेले हे संकट इतरांचेही डोळे गहीवरून टाकणारे आहे. कारण विहीरी फोडताना हाताला ज्या पद्धतीने त्रास होतो, हे ज्याने ते काम केले त्यालाच माहीत. अशा प्रचंड मेहनतीने जुळवलेला पै पै आगीत खाक झाले आहे. 

 

अंगात घालायचे पकडे तेवढे शिल्लक राहीले 
नेहमीप्रमाणे आम्ही शनिवारी सकाळी कामाला गेलो, बाबा विहिरीच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे विकलेल्या कापसाचे साठ हजार रुपये बँकेत टाकणे जमले नाही. उरलेला कापूस विकून घर बांधायचा विचार होता मात्र आगीने आमचे काहीच शिल्लक ठेवलं नाही, रात्रीच्या जेवणासाठीही घरात काही राहील नाही, आमच्या अंगात असलेले कपडे तेवढे आमच्याजवळ आता उरलेले आहेत. शॉर्ट सर्कीटने आग लागल्याचा अंदाज आहे. अंकित बोरवार. 

बातम्या आणखी आहेत...