आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर रेल्वे दुर्घटना: मृतदेहांच्या तुकड्यांचे काय झाले; एक हात, पाय अन् शरीराचे अवयव कटून फसलेले आहेत रेल्वेखाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - शुक्रवारी जोडा फाटकाजवळ दसरा मेळावा पाहण्यासाठी आलेल्या लोकांना रेल्वेने चिरडल्यानंतर त्यांच्या शरीराचे अवयव अर्धा किलोमीटर परिसरात विखुरले गेले होते. घटनेच्या 5 तासांनंतरही पोलिस कर्मचारी येथे सुरक्षेसाठी दिसले. यापुढच्या दोन दिवसांपर्यंत लोक आपल्या कुटुंबातील व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आणि त्यांचे वेगळे झालेले अवयव गोळा करण्यासाठी गुंतलेले होते. दुसरीकडे शुक्रवारी रात्री अपघातानंतर जेव्हा ही डीएमयू ट्रेन अमृतसरला पोहोचली, तेव्हा गाडीसेाबत अनेक मानवीय अवयव चिकटलेले होते.

 

लोकांच्या शरीराचे तुकडे, रेल्वेत फसलेले होते 
सूत्रांनुसार, एक हात, पाय आणि काही जणांच्या शरीराचे इतर अवयव रेल्वेच्या खालच्या भागात फसलेले होते. घटनेच्या काही वेळानंतर रेल्वेने या डीएमयू ट्रेनला अमृतसर स्टेशनच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवरून हटवून बॉर्डर एरियातील एका स्टेशनवर पाठवले. दुसरीकडे ट्रेनसोबतच अडकलेल्या अवयवांची माहिती अद्यापही जिल्हा प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याकडे नाहीये. नियमानुसार हे अवयव आरोग्य विभागाच्या स्वाधीन केले पाहिजे होते.

 

असे मिटताहेत पुरावे : कुत्रे चाटत होते रेल्वेला लागलेले रक्त

चार डब्यांच्या या गाडीचे इंजिन आणि सुरुवातीच्या दोन डब्यांवर जागोजागी रक्ताचे डाग लागलेले आहेत. रेल्वेने या गाडीला बॉर्डर एरियाच्या एका रेल्वे स्टेशनवर उभे केले, जेणेकरून कोणीही त्याची छेडछाड करू नये. परंतु येथे फिरायला येणारे भटके कुत्रे रेल्वेवर लागलेले रक्त चाटत आहेत.

 

डॉक्टर म्हणाले- रेल्वेने आम्हाला नाही सोपवले कोणाच्याही शरीराचे अवयव
अमृतसरचे सिव्हिल सर्जन डॉ. एसएच घई सांगतात की, रेल्वे अधिकाऱ्यांनी त्यांना ना कोणते अवयव सोपवले, ना याबाबत कोणतीही माहिती दिली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...