आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking Story Reveled From Kundan Balika Grih House Case In Ratlam Jawra Ratlam MP News

या सुंदर महिलेचे नेतेमंडळींसोबत कनेक्शन, याच ओळखीच्या बळावर होस्टेलमध्ये मुलींच्या आयुष्याशी खेळत होती घाणेरडा खेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जावरा/रतलाम - जावराच्या कुंदन कुटीर बालिकागृहाची संचालिका व माजी बालकल्याण समिती अध्यक्ष डॉ. रचना व तिचा पती ओमप्रकाश भारतीय यांनी आपल्या राजकीय ओळखीच्या बळावरच कुकर्म सुरू ठेवले होते. काँग्रेसी घराण्याच्या डॉ. रचनाची बालकल्याण समितीत नियुक्ती करण्याची शिफरसही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच केली होती. याच कारणामुळे सीएम कमलनाथ यांनी आता बालिकागृहात राजकीय हस्तक्षेप बंद करण्याची घोषणा केली आहे.


मुख्यमंत्र्यांचे ट्विट: राज्यभरातील बालिकागृहांत बंद होणार राजकीय हस्तक्षेप

बालिकागृहातून मुली  पळून गेल्याच्या आठ दिवसांनंतर आणि संचालिका डॉ. रचनासहित 4 जणांविरुद्ध एफआयआर दाखल झाल्याच्या दोन दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर जबाबदार अधिकारी आणि संस्थाचालकांवर कडक कारवाई करण्याचे म्हटले आहे. शनिवारी रात्री 8.42 वाजता करण्यात आलेल्या ट्विटमध्ये त्यांनी सर्व सरकारी व खासगी बालिकागृह, छात्रावास, बालिका सुधारगृहांची सतत निगराणी व निरीक्षणाचे निर्देश दिले. ते म्हणाले की, कागदी व दिखाऊ निरीक्षणे सहन केली जाणार नाहीत. मागच्या सरकारच्या वेळी खासगी तसेच एनजीओद्वारे संचालित बालिकागृह व संस्थांची मनमर्जी संपुष्टात आणून राजकीय हस्तक्षेप बंद केला जाईल. अशा संस्थांचे सोशल ऑडिट करत तेथे राहणाऱ्या मुलींशी संवाद कायम केला जाईल.

 

वर्षभरापासून सुरू होत्या संशयास्पद हालचाली
बालिकागृहात वर्षभरापासून संशयास्पद हालचाली सुरू होत्या. दर महिन्याला निरीक्षण करण्यासाठी येणाऱ्या एका अधिकाऱ्याने याचा अहवालही वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिला परंतु त्यांनी प्रकरण दाबून ठेवले. 24 जानेवारी रोजी या 5 मुली पळून गेल्या नसत्या तर बहुधा या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश झाला नसता. दंडाधिकाऱ्यांच्या चौकशीत झालेल्या खुलाशानंतर अनेक अधिकारी चौकशीच्या रडारवर आले आहेत. चारही आरोपींच्या अटकेनंतर त्यांना पोलिस कोठडी मिळण्याऐवजी थेट तुरुंगात रवानगी झाल्याने लोकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


मुली राहत असलेल्या खोल्यांत आढळले पुरुषांचे कपडे
पोलिसांनी रचनाचे घर व बालिकागृहाची तपासणी केली तेव्हा दारूच्या बाटल्या, झाकणे तथा मुली राहत असलेल्या खोल्यांतून पुरुषांचे कपडे आढळले आहेत. बालिकागृहाच्या हालचाली वर्षभरापासून ठीक नव्हत्या. ही बाब बाल संरक्षण अधिकारी पवन कुंवर सिसौदिया यांनी दंडाधिकारीय चौकशी समितीसमोर सांगितली. एसडीएम एम. एल. आर्य यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीचाही यात उल्लेख आहे.


भाजप व  काँग्रेस नेत्यांचे होते संरक्षण
कुंदन कुटीर बालिकागृह भाजप व काँग्रेस नेत्यांच्या संरक्षणाखाली सुरु होते. दारू पिऊन बालिकांना मारहाण करणारी संस्थापिका तसेच माजी बालकल्याण समिती अध्यक्ष डॉ. रचना भारतीयच्या मायाजालात दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांचे नेते अडकलेले होते. रचना माजी गृहमंत्री व वरिष्ठ काँग्रेसी नेते राहिलेले भारत सिंह यांचे खासगी सचिव एसएन ठक्कर यांची कन्या आणि माजी काँग्रेसी नपाध्यक्ष कुंदनमल भारतीय यांची सून आहे.

 

रचनाला या प्रकारे सदस्य बनवण्याऐवजी अध्यक्ष बनवण्यात आले
रचनाला बाल कल्याण समितीत घेण्याची शिफारस मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांचे सुपुत्र व आलोटचे आमदार जितेंद्र यांनी भाजप जिल्हाध्यक्ष कानसिंह चौहान यांना केली होती. त्यांनी कोणतीही चौकशी न करता शिफारस पत्र पुढे सरकावले. परिणामी सदस्य बनवण्याऐवजी रचना यांना अध्यक्षच बनवण्यात आले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...