आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक! शाळेत उशिरा आल्याने विद्यार्थ्यांना तासभर हात वर करुन उभे केले नग्न अवस्थेत; विद्यार्थी उडवत राहिले खिल्ली, व्हायरल झाला व्हिडिओ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्तूर- आंध्रपेदशमध्ये एका शालेय शिक्षकाने विद्यार्थ्यांसोबत लज्जास्पद वर्तवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेत उशिरा आल्यावरुन शिक्षकाने विद्यार्थ्यांना कपडे काढण्यास सांगून नग्न अवस्थेत उन्हात उभे केले. चित्तूर जिल्ह्यातील पुनगनूर भागातील ही शाळा असून पालकांनी सबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.   

 

व्हायरल झाला व्हिडिओ
पालकांनी सांगितल्यानुसार, शिक्षकाने शाळेत उशिरा आलेल्या 6 विद्यार्थ्यांना हात वर करुन नग्न अवस्थेत उन्हात उभे राहण्याची शिक्षा दिली.  त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी हा प्रकार आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करुन शेअर केला. या प्रकरणाची चर्चा झाल्यानंतर पालकांनी सबंधित शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदवली. त्यानंतर शिक्षण विभागाने तातडीने याची दखल घेवून शिक्षकावर कारवाई करुन शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...