आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shocking Tamil Nadu Brother Allegedly Molested His Minor Sister From A Year And Impregnates Her

जेव्हा-जेव्हा आईवडील घरी नसायचे, तेव्हा-तेव्हा मोठा भाऊच करायचा असे काही, शाळेत शिक्षिकेला शंका आली मग उघड झाला धक्कादायक प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडू - कोइंबतूरमध्ये भाऊ-बहिणीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उजेडात आली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने आपल्या इयत्ता 9वीत शिकणाऱ्या छोट्या बहिणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. मोठा भाऊ वर्षभरापासून छोट्या बहिणीवर बलात्कार करत होता. मुलगी एका दिवशी शाळेत गेली असता तिच्या शिक्षिकेला ती गर्भवती असल्याची शंका आली. त्यांनी तिला रुग्णालयात चेकअपसाठी नेले असता याची खात्री पटली.

 

असे आहे प्रकरण...

रुग्णालयातील चेकअपनंतर पीडित मुलीने सर्वकाही सांगून टाकले. पीडितेने सांगितले की, घरी जेव्हा आईवडील नसायचे तेव्हा तिचा भाऊ हे कुकृत्य करायचा. ती म्हणाली की, भाऊ मागच्या वर्षभरापासून हे सर्व करत होता. ही घटना उजेडात आल्यावर आरोपी भाऊ फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. वृत्तसंस्थेनुसार, आरोपी मुलगा डिप्लोमा कोर्सचे शिक्षण घेत आहे, तर त्याची बहीण इयत्ता 9वीत महापालिका शाळेत शिकतेय. 

 

आरोपी भावावर दाखल झाला गुन्हा

पोलिसांनी याप्रकरणी पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधासाठी पथकेही रवाना करण्यात आली आहेत. लवकरच त्याला पकडू असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

नुकतेच असेच एक प्रकरण पुण्यातही समोर आले आहे. यात एका व्यक्तीने कथितरीत्या आपल्या 17 वर्षीय बहिणीवर अनेक वेळा बलात्कार केल्याने ती गर्भवती झाली. सप्टेंबरमध्ये पीडितेने एका बाळाला जन्मही दिला. तथापि, याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. 

 

 

बातम्या आणखी आहेत...