Home | Khabrein Jara Hat Ke | Shocking Things : China Doesnt Want Us To Know

Did U Know : चीनच्या या गोष्टी जगाला नाहीत ठाऊक, वाचा कोणत्या आहेत त्या?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 07, 2018, 12:24 AM IST

चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know


  चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. त्यांची लोकसंख्या जवळपास 1 अब्ज 35 कोटी आहे. चीन या देशाची काही रहस्ये असे आहेत, जी जगात क्वचितच लोकांना ठाऊक असतील. चीनच्या लोकांना वाटते, की याविषयी जगातील कुणालाच काही माहिती होऊ नये. आज आम्ही तुम्हाला चीनच्या रहस्यांविषयी माहिती सांगत आहोत...


  सरळ गोळ्या घालतात...
  सर्व देशांनी शिक्षा देण्याच्या प्रक्रियेत थोडी सुट दिली आहे. परंतु चीन जून्याच कायद्याचे पालन करते. येथे गुन्हेगारांना फाशी किंवा केमिकल अटॅक न देता सरळ गोळी मारून ठार केले जाते. 2005मध्ये जगभरात जितक्या लोकांना मृत्यूची शिक्षा देण्यात आली, त्यात एकमेव चीनची संख्या चारपट जास्त होती.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या चीनच्या इतर रहस्यमयी गोष्टी...

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  अनेक शहरांत आहेत भूत...
  चीनमध्ये जवळपास 6 कोटी 50 लाख घरे रिकामी आहेत. त्यात अनेक गावेसुध्दा सामील आहेत. येथे कुणीच राहत नाहीत. हे जूने किंवा पडके घर नाहीत, नवीन गावे आणि भवन आहेत. यांना वाढती लोकसंख्या पाहून बनवण्यात आले होते. 

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  रिकामे आहेत मॉल...
  चीन गर्वाने सांगते, की त्यांच्या देशात मोठ-मोठे मॉल आहेत. त्यांचे नाव न्यू साऊथ चाइना मॉल आहे. त्यात 2350 दुकाने आणि 70 लाख स्क्वेअर फुट जागा भाड्याने देता येऊ शकते. परंतु हा मॉल सुरु झाल्यानंतर 7 वर्षांनी 99 टक्के जागा रिकामी आहे. याच्या प्रवेशव्दाराजवळ काही फास्ट फुडची दुकाने आहेत. 

   

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  पार्कमध्ये राहतात बौने...
  चीनमध्ये एका ठिकाण आहे, त्याला किंगडम ऑफ द लिटल पीपुल म्हटले जाते. या ठिकाणी बौने लोक पर्यटकांचे मनोरंजन करतात. या पार्कमध्ये जवळपास 100पेक्षा जास्त बौने राहतात. 

   

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  गुहेत राहतात लोक...
  येथील 3 कोटींपेक्षा लोक गुहेत राहतात. त्यातील जास्तित जास्त लोक शानशी प्रातांत राहतात. तिथे मातीच्या गुहा बनवणे सोपे असते. त्यांना विटांनी सजवले जाते. 

   

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  वायु प्रदुषण
  ची
  नचे काही शहरे इतके दुषित आहेत, की लोकांना श्वास घेणेदेखील कठिण होऊन बसते. बिजींग आणि चीनच्या इतर क्षेत्रात नद्यांमध्ये फॅक्ट्री, कंपन्यांमधून निघणारे मटेरिअल, कचरा, घरातून बाहेर पडणारा कचरा टाकला जातो. त्यामुळे येथील वातावरण दुषित होते. येथील पाणी पिणे म्हणजे, मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. ही समस्या केवळ चीनपर्यंत मर्यादीत नाहीये, ही हवा उत्तर कॅलिफोर्नियापर्यंत जाते. 

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  मुलांमध्ये असतो जन्मजात दोष...
  2001 पासून चीनमध्ये जन्म घेणारी मुले जन्मजात दोषाचे शिकार असतात. त्यांची संख्या 40 टक्क्यांच्या दराने वाढत जात आहे. चीनमध्ये दरवर्षी 1 कोटी 20 लाख नवजात बालक जन्मजात दोषी असतात.

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  लोक पितात दूषित पाणी...

  संपूर्ण देशात दूषित पाण्याची मोठी समस्या आहे. दररोज 70 कोटी लोक अस्वच्छ पाणी पितात. केवळ 10 टक्के सीव्हेजचे रीयूज केले जाते. इतर अस्वच्छ पाणी नदी, तलाव आणि झ-यांमध्ये सोडले जाते. हा पाणीपुरवठा घरा-घरांत केला जातो. 

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  पुनर्जन्मावर बंदी...
  एका हस्यास्पद दावा आहे, की चीन सरकारने बौद्ध भिक्षुंच्या पुनर्जन्मावर बंदी घातली आहे . तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे शक्य आहे? असे म्हटले जाते, की येथे पुन्हा जन्म घेण्यासाठी चीन सरकारची परवानगी घ्यावी लागते. वास्तवात, अशा हस्यास्पद प्रयत्नांमागे दलाई लामा यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न आहे.

   

 • Shocking Things : China Doesnt Want Us To Know

  गोबी वाळवंटात सामावला जातोय चीन...

  गोबी वाळवंट चीनचे सर्वात मोठे वाळवंट आहे. 500,000 स्क्वेअर मैलमध्ये पसरलेला आहे. हा पेरूच्या आकारमाना इतका आहे. हे वाळवंट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरवर्षी यात 1400 स्क्वेअर मैल अंतर सामावले जात आहे. सतत होणारी जंगलतोड, पाण्याच्या कमतरतेने असे होत आहे. 
   

Trending